आजपासून तिकीट दरात १५ टक्के वाढ
एसटी बससोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता; भाडेदरात ३ रुपयांची दरवाढ
मुंबई
राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के दरवाढीचा निर्णय परिवहन महामंडळाच्या प्राधिकरणाने घेतला आहे. यावेळी एस टी तिकीट दरासोबतच रिक्षा आणि टॅक्सी च्या भाडेदरात तीन रुपयांची वाढीलाही मंजूरी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांचे दळणवळणानेच प्रवासाचे हक्काचे साधन असलेली लालपरी आता महागली आहे. ही दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
मंत्रालयात काल राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी तिकीटदरासह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेदर वाढीचाही निर्णय घेण्यात आला. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोल दर वाढत असल्याने परिणामी एस तिकीट दरवाढ अपेक्षित होती. मात्र गेल्या ३ ते ४ वर्षांत हा भाडे दरवाढीचा निर्णय प्रलंबित राहीला होता. अखेर १४.९७ टक्के दरवाढीला मंजूर देण्यात आली. हा दरवाढ आजपासून (दि. २४ ) पासून लागू होणार आहे. आणि रिक्षा, टॅक्सीची दरवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Previous Articleसावंतवाडीत रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
Next Article बहुचर्चित घरपट्टीवाढीला अखेर स्थगिती !








