कोल्हापूर- प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले आहे. गेल्या दोन तासांपासून एसटी वाहतुकीसह आगारही बंद केल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात अनेक कारणावरून संघर्ष सुरू आहे. अखेर त्यावरून सर्व कामगारांनी एकत्र येऊन आज दुपारपासून काम बंद ठेवले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून काही मार्गावरील एसटी सेवा देखील ठप्प झाल्या आहेत.
शुक्रवारी आगार व्यवस्थापक अमर निकम यांनी एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हे काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









