शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केला पाठपुरावा
ओटवणे प्रतिनिधी
ओवळीये मुख्यमार्गावरील पुलाचे काम सुरू असून पर्यायी रस्ता सुस्थितीत नसल्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक गेले महिनाभर बंद होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या गैरसोयीबाबत विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम व जि प बांधकाम खात्याचे रस्ता सुस्थितीत असल्याचे पत्र घेऊन एसटी प्रशासनाचे लक्ष वेधताच सर्वे करून बुधवारपासून त्या मार्गावरील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. त्यामुळे ओवळीये गावातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.पुलाचे काम सुरू पर्यायी रस्त्याने एसटी नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकामचे पत्र नसल्यामुळे एस प्रशासनाने एसटी ओवळीये गावात येण्यास नकार दिला. त्यामुळे एसटी ओवळीये गावात न येताच देवसु तिठा येथूनच माघारी जात होती. त्यामुळे गेले महिनाभर ओवळीये गावातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय झाली. याची माहिती माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांना मिळताच त्यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम सावंतवाडी स्थानक प्रमुख राजाराम राऊत आगारप्रमुख निलेश गावित यांची भेट घेतली. नंतर सार्वजनिक बांधकाम खाते व जिल्हा परिषद बांधकाम खाते यांच्याकडून पूलाचा पर्यायी रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र घेतले. त्यानंतर सदर पत्र कणकवली येथील एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री हूले, वाहतूक प्रमुख गौतमी कुबडे यांना कणकवली येथे जाऊन सादर केले. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार एसटीचे विभागीय वाहतूक निरीक्षक एल एम सरवदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक के के यादव, चालक आर एन मुल्ला यांनी मंगेश तळवणेकर यांच्यासह यांनी ओवळीये गावात जात पर्यायी रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर या पर्यायी रस्त्यावरून एसटी वाहतूक सुरू करण्यास एसटी प्रशासनाने मान्यता दिली. त्यामुळे गेले महिनाभर बंद असलेली या गावातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू झाली यावेळी सदानंद सावंत बाबुराव सावंत, जगन्नाथ सावंत, प्रकाश सावंत, महेश सावंत, मोहन सावंत, न्हानू सावंत, महादेव सावंत, योगेंद्र सावंत, वैशाली सावंत, वनमाला सावंत अश्विनी सावंत, अश्विनी राऊळ, हेमलता राऊळ, सुधीर नाईक, अजय सावळ, बाबू राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.









