ओटवणे घाटीत यु आकाराचे वळण येथील घटना
ओटवणे प्रतिनिधी
रिव्हर्स गिअर लॉक झाल्यामुळे एसटी भर रस्त्यावरच बंद पडल्याची घटना शनिवारी सकाळी ओटवणे घाटीत यु आकाराच्या वळणावर घडली. सुदैवाने एसटी चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावुन जागच्याजागी एसटी बंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सावंतवाडी बस स्थानकातून सकाळी ८:४० वाजता सुटलेली सावंतवाडी – ओटवणे ही एसटी ओटवणे घाटीत यु आकाराच्या वळणावर येताच एसटीचे रिव्हर्स गिअर लॉक झाले. त्यामुळे चालकाने तात्काळ ब्रेक लावून एसटी जागेवरच थांबवली. अन्यथा एसटी या वळणाखालच्या ३० फूट खोल दरीत गेली असती. एसटी चालकाने सावंतवाडी बस स्थानकाला कळवून या घटनेची माहिती दिली. दरम्यान ही बस ओटवणे गावात न गेल्यामुळे प्रवाशांसह कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.









