बेळगाव : कनक स्कूल आयोजित 12 व्या फिनिक्स चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंटपॉल्सने सेंट झेवियर्सचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करुन फिनिक्स चषक पटकाविला. सुमित गाणगेकरला उकृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. फिनिक्स चषक फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट पॉल्सने कनक मेमोरियलचा 4-1 असा पराभव केला. सेंट पॉल्सतर्फे आराध्य नाकाडीने पेनाल्टी शुटवर पहिला गोल केला. अब्दुल मतीनने 2 गोल केले तर चौथा गोल सकलेन मुल्लाने करुन 4-0 ची आघाडी मिळविली. कनकतर्फे श्रीधरने 1 गोल केला.
अंतिम सामन्यात सेंट पॉल्सला झेवियर्सने निर्धारीत वेळेत शुन्य बरोबरीत रोखले. या वेळेत दोन्ही संघांना गोल करण्याची अनेक संधी मिळाल्या होत्या. पण त्यांनी त्याचा फायदा उठवू शकले नाहीत. त्यानंतर पंचांनी जादा वेळ नियमाचा वापर केला. त्यामध्येही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. शेवटी पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये सेंट पॉल्सने 3-1 असा पराभव केला. सेंटपॉल्सतर्फे सुमित गाणगेकर, अब्दुल मतीन व विराट भोसले यांनी गोल केले. तर झेवियर्सतर्फे नदीमने 1 गोल केला. या सामन्यात गोलरक्षक शॉन पेसने उत्कृष्ठ गोलक्षणाचे प्रदर्शन घडवित दोन पेनल्टी फटके अडविल्याने विजयास सिंहाचा वाटा उचलला.
या विजयी संघात शॉन पेस, सुमित गाणगेकर, यशोधन गंधाडे, विराट भोसले, अहम्मद पठाण, श्रीधन गंधाडे, सकलीन मुल्ला, रियान कलादगी, प्रणव पिल्ले, अब्दुल मतीन, अराध्य नाकाडी, जर्मन डिसोजा, इथन डिसोजा, वेदांत जाधव, अलविन मस्कारेन्स, श्रेयेस चिन्नी यांचा समावेश आहे. या संघाला शाळेचे मुख्याध्यापक फादर सिमन फर्नांडीस, उपमुख्याध्यापक फादर अॅल्ड्रो डिकोस्टा, क्रीडा शिक्षक अॅन्थोनी डिसोजा, बालेश, आशिक सरकार व संघाचे प्रशिक्षक अखिलेश अष्टेकर यांचे मार्गदर्शन लाभले.









