फिनिक्स चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : फिनिक्स स्कूल होनगा आयोजित फिनिक्स चषक 16 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून लिटल स्कॉलर्सने भातकांडेचा तर सेंट पॉल्सने गुड सेफर्डचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे. सुरज पाटील (लिटल स्कॉलर्स), साईराज सांळुखे (सेंट पॉल्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. होनगा येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भातकांडेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडीबाद 147 धावा केल्या. त्यात प्रितम पी. ने 36, सुप्रित बी. ने 28 तर अवदुंबरने 22 धावा केल्या. लिटल स्कॉलर्सतर्फे सुरज पाटीलने 2, प्रितम व विशाल यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. प्रत्युतरादाखल खेळताना लिटल स्कॉलर्शने 20 षटकात 7 गडीबाद 148 धावा करून सामना 2 गड्यांनी जिंकला. त्यात सुरज पाटीलने 40, मयांकने 39, अमोलने 13 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात सेंट पॉल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडीबाद 225 धावा केल्या. त्यात साईराज साळूंखेने 94, सिंध्दातने 56 तर स्वरूप साळुंखेने 53 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना गुडशेफर्ड संघाचा डाव 19.5 षटकात सर्वबाद 92 धावांत आटोपला. त्यात पार्थने 22 धावा केल्या. सेंट पॉल्स तर्फे सुमेध, निल पवार, साईराज यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केला. गुरूवारचे सामने: 1) सेंट मेरीज वि. लिटल स्कॉलर्स यांच्यात सकाळी 9 वाजता. 2) केएलएस वि. ठळकवाडी यांच्यात दुपारी 1.00 वाजता खेळविण्यात येणार आहे.









