केएलई इंटरनॅशनल स्कूल विजेते तर डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूल उपविजेते : 13 शाळांचा सहभाग
बेळगाव : सेंट पॉल्स हायस्कूलतर्फे क्रोनोस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये केएलई इंटरनॅशनल स्कूलने विजेतेपद पटकाविले. तर डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूल उपविजेता संघ ठरला. कार्यक्रमात घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये 13 शाळांचे 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, नृत्य, कला, उद्योजकता, मि. अँड मिस, स्टँडअप कॉमेडी, वादविवाद, प्रश्नमंजुषा, सिनेमोटोग्राफीसह विविध स्पर्धा घेतल्या.
निकाल पुढीलप्रमाणे-
उत्कृष्ट कलाकृती- 1) सेंट जोसेफ स्कूल, 2) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स, 3) चब्बी चिक्स स्प्रिंगव्हॅली (गोवा). सिनेमोटोग्राफी-1) ज्ञान प्रबोधन मंदिर, 2) सेंट जोसेफ, 3) केएलई इंटरनॅशनल स्कूल. वादविवाद स्पर्धा-1) केएलई इंटरनॅशनल स्कूल, 2) सेंट जोसेफ स्कूल, 3) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स स्कूल. समूहनृत्य-1) एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, 2) केएलई इंग्लिश मीडियम स्कूल, 3) केएलई इंटरनॅशनल स्कूल. उद्योजकता स्पर्धा-1) ज्ञान प्रबोधन मंदिर, 2) जैन हेरिटेज, 3) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स. समूह गीतगायन-1) चब्बी चिक्स स्प्रिंगव्हॅली (गोवा), 2) केएलई इंटरनॅशनल स्कूल, 3) ज्ञान प्रबोधन मंदिर. सरप्राईज इव्हेंट-1) एम. व्ही. हेरवाडकर, 2) केएलई इंटरनॅशन, 3) जैन हेरिटेज. स्टँडअप कॉमेडी-1) डिव्हाईन प्रॉव्हिडन्स, 2) सेंट जोसेफ, 3) लव्हडेल स्कूल. मिस्टर अँड मिस-1) ईशान नाडकर्णी, हेरवाडकर स्कूल, 2) साची पाटील, डिव्हाईन प्रॉव्हिडन्स. प्रश्नमंजुषा-1) केएलई इंटरनॅशनल, 2) केएलई इंग्लिश मीडियम, 3) डिव्हाईन प्राव्हिडन्स. मेंटॉर चॅलेंज-1) केएलई इंटरनॅशनल, 2) जैन हेरिटेज, 3) चब्बी चिक्स स्प्रिंग व्हॅली (गोवा).
कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे उपमहालेखापाल प्रतीक पाटील, प्रा. फादर साविओ, उपप्राचार्य फादर सेबेस्टियन, फादर सायमन फर्नांडिस, लिनेरिया स्वामी, रुपा चडिचल यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









