संतीबस्तवाड, झेव्हियर्स, जोसेफ, फिनिक्स उपांत्य फेरीत
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौंन्सिल आयोजित फिनिक्स चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंटपॉल्स, केएलएस, सेंट झेव्हियर्स व इस्लामिया संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सेंट झेव्हियर्स, फिनिक्स, सेंट जोसेफ संतीबस्तवाड व सेंट जोसेफ बेळगाव संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. फिनिक्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एमव्हीएमने कणक मेमोरियलचा 1-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात इस्लामीयाने विजया संघाचा 1-0 असा पराभव केला.
तिसऱ्या सामन्यात सेंट पॉल्सने ज्योती सेंट्रलचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव केला. चौथ्या सामन्यात झेव्हियर्सने केएलई इंटरनॅशनलचा 4-0 असा पराभव केला. पाचव्या सामन्यात केएलएसने मराठी विद्यानिकेतनचा 1-0 असा पराभव केला. तर इस्लामीयाने संजय घोडावतचा 1-0 असा निसटका पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात साखळी स्पर्धेत सेंट जोसेफ संतीबस्तवाडने विजया स्कूलचा 6-0 असा पराभव केला. संतीबस्तवाडतर्फे अन्नपूर्णा किणेकरने 3 नेहा कोडतीने 2 तर स्नेहा सातारपूरने 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात सेंट झेव्हियरने सेंट जोसेफ बेळगावचा 1-0 असा निसटता पराभव केला. झेव्हियर्सतर्फे वसुंदरा चव्हाणने एकमेव गोल केला.
बुधवारचे उपांत्य फेरीचे सामने
- सेंट पॉल्स वि. केएलएस सकाळी 8.30 वा.
- सेंट झेव्हियर्स वि. इस्लामीया सकाळी 9.30 वा.









