मराठा युवक संघ जलतरण स्पर्धा : महिला गटात डीपी विजेते
बेळगाव : आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या मराठा युवक संघाच्या 20 व्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 78 गुणासह सेंट पॉल्स स्कूलने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब पटकाविला. मुलींच्या गटात डिवाइन प्रॉव्हिडन्स (डीपी) स्कूलने 69 गुणासहित विजेतेपद पटकाविले. सेंट झेवियर्स आणि केएलई इंटरनॅशनल स्कूलने उपविजेतेपद मिळविले. सदर स्पर्धा गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात भरविण्यात आल्या. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे महापौर मंगेश पवार, नितीन जाधव, डॉ. नरेंद्र पाटील, उद्योजक महादेव चौगुले, संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, चंद्रकांत गुंडकल, माऊती देवगेकर, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबते, नारायण किटवाडकर, शिवाजीराव हंगीरगेकर, सुहास किल्लेकर, विजय बोंगाळे, विश्वास पवार यांच्या हस्ते विजेत्या जलतरणपटूंना प्रशस्ती पत्र, पदक चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक विजेतेपद मिळवलेल्या जलतरणपटूंची नावे पुढील प्रमाणे.. कॉलेज गट तनुज सिंग-जीएसएस कॉलेज, गट 1- आदी शिरसाट-केंद्रीय विद्यालय 2, गट-2 अमोघ रामकृष्ण-सेंट पोल्स स्कूल, गट-3 मोहित काकतकर सेंट झेवियर्स, गट-4 अद्वैत जोशी-केएलए स्कूल, गट-5 नमन पाटील-सेंट पॉल्स, गट-6 रिश बिर्जे-कामधेनु स्कूल. मुलींच्या विभागात कॉलेज गटात सुनिधी हलकारे-आरटी पीयु, गट-1 समृद्धी हलकारे-ज्ञान प्रबोधन मंदिर, गट-2 रिया पवार-केएलई इंटरनॅशनल, गट-3 निधी मुचंडी-सेंट मेरीज, गट-4 रिया पोरवाल-केएलई इंटरनॅशनल, गट-5 दर्शिका निट्टूरकर-सेंट मेरीज, गट-6 अद्विका पी.-सेंट झेवियर्स. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा क्लबचे अमित जाधव, संदीप मोहिते, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, माऊती घाडीसह इतर सभासदांनी विशेष परिश्र्रम घेतले.









