क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात सेंट पॉल्स संघाने तर मुलींच्या गटात संत मीराने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर खेळविण्यात आलेल्या मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेंट पॉल्सने संत मीरा संघाचा 3-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. सेंट पॉल्सतर्फे जोशवा वाज, नवलशेख सराफ, अथर्व बीडीय, संत मीरातर्फे वैभव मरगाळाने 1 गोल केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट जोसेफ शाळेचा टायबेकवर 4-2 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. संत मीरातर्फे रेनिवार माशेय, सलामी कोलाराई, खोबरूस एम डी, स्वरा आंजनकर तर सेंट जोसेफच्या वतीने सायली व झोया यांनी गोल केले.
दोन्ही संघ जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेला पंच म्हणून कौशिक पाटील, ओमकार सावगांवकर, योगेश सावगांवकर, जयेश सांबरेकर, मानस नायक यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयसिंग धनाजी, बापू देसाई, सी. आर. पाटील, मारुती मगदूम, संजीव बडगेर, आर. पी. वंटगुडी, शहराच्या पीईओ जाहिदा पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.









