बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय स्तरीय माध्यमिक मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगावचे प्रतिनिधित्व करताना मुलींच्यात सेंट जोसेफ व मुलांच्यात बागलकोट विभागाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटातील उपांत्य सामन्यात चिकोडीने धारवाडचा पेनाल्टी शूटआउटवर 4-3 असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफ बेळगावने बागलकोटचा 6-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात सेंट जोसेफने चिकोडीचा अटीतटीच्या लढतीत पेनाल्टी शूटआउटवर 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात बागलकोटने बेळगावच्या संत मीरा स्कूलचा सडनडेथवर 4-3 असा पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
प्रमुख पाहुण्या माधुरी जाधव, भारतीय ज्युडो संघाची प्रशिक्षिका रोहिणी पाटील, कुतुजा मुलतानी, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, उद्योजक के. आर. शेट्टी, स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी, पुनित शेट्टी, प्रसन्ना शेट्टी, राकेश कांबळे, पवन कांबळे, संतोष दळवी, किरण तरळेकर, प्रवीण पाटील, नागराज भगवंतण्णावर, रमेश सिंगद, सी. आर. पाटील, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच मानस नायक, उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, रामलिंग परीट, उमेश बेळगुंदकर, अनिल जनगौडा, अनिल गोरे, अर्जुन भेकणे, अश्विनी पाटील, सखुबाई हावळकोड, सुभाष गंभीर, आय. एम. पटेल यांनी काम पाहिले.









