Kolhapur : कोल्हापुरातील एसटी चालकाचा अकलूज येथे मुक्कामी असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना अकलूज येथे पहाटेच्या सुमारास बुधवारी (ता .8) घडली. आनंदा यमगेकर (रा. कावणे ता. करवीर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ते छत्रपती संभाजी नगर आगारात चालक म्हणून काम पाहत होते.
यमगेकर मंगळवारी नेहमीप्रमाणे कामावर आले होते. कोल्हापूर ते अकलूज मार्गावर त्यांची ड्युटी लागली होती. मंगळवारी रात्री ते अकलूज येथे मुक्कामी ड्युटी लागली होती. झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांच्या मृत्यूमुळे नातेवाईक आणि सहकाऱ्यामध्ये शोक व्यक्त होत आहे.
Previous Articleलोककल्पतर्फे आमगाव शाळेला बेंच वितरण
Next Article ‘चांगभलं’च्या गजरात भावेश्वरी यात्रेला प्रारंभ









