मालवण : प्रतिनिधी
देवली गावच्या हद्दीत येणारा जोड रस्ता खालची देवली ते वरची देवली हा चार वर्षांपूर्वी पूर्णत्वास आला. या रस्त्यामध्ये येणाऱ्या गव्हाणवाडीतील ग्रामस्थांना एसटी बसचा प्रवास करण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत होती. या मार्गावरून एसटी बस फेरी सुरू करण्याची मागणी केली जात होती. अखेर या मार्गावरून एसटी प्रशासनाने बस सेवा सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ शनिवारी झाला. गव्हाणवाडी येथे या एसटीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवली गावचे सरपंच श्यामसुंदर प्रल्हाद वाककर, ग्रामपंचायत सदस्य सचिन मालवणकर, शिवदास चव्हाण, बबलू चव्हाण, समीर वेतुरेकर, भाई चव्हाण, संतोष आळवे, अनिल अचरेकर, रुपेश आळवे, गुरुनाथ पाटकर, अनिल आचरेकर, संदेश वेतुरेकर, गणेश सारंग, आकाश बिरमोळे यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते









