चिपळूण
परशुराम घाटात भरधाव वेगात असलेल्या टँकरने चिपळूणच्या दिशेने येणाऱया एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. मात्र या अपघातात ही बस सुदैवानेच घाटात कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली आणि मोठा अनर्थ टळला. यामुळे या बसमधील तब्बल 64 पवासी बालंबाल बचावले आहेत. ही घटना शुकवारी दुपारी 1.30 वाजता घडली.
या अपघातात नंदिनी कमलाकर बडदे (31, परशुराम), जितेंद्र वसंत रेमजे (33, खेड) असे दोन पवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कामथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, टँकर चालकास खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिपळूण आगाराची खेड-चिपळूण बस दुपारी खेड आगारातून सुटल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात 1 च्या सुमारास एका अवघड वळणावर आली असता याचवेळी चिपळूणकडे भरधाव वेगाने येणाऱया टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने एसटीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर एसटी बसगाडी रस्त्यालगत एका बाजूला कलंडली तर टँकर रस्त्याच्या दुसऱया बाजूस मातीत अडकला. तसे पाहिल्यास चिपळूण व खेड मार्गावरील ये-जा करणाऱया एसटी बसफेऱयांना पवाशांची कायम गर्दी असते. अपघातग्रस्त एसटी बसमध्येही तब्बल 64 पवासी होते. मात्र इतके पवासी असताना अपघातानंतर सुदैवाने मोठा अनर्थ टळला अन्यथा थोड्या अंतरावर असलेल्या दरीत ही बस कोसळण्याचा मोठा धोका होता.
अपघातानंतर पहिल्यांदा या बसगाडीतील सर्व पवाशांना बसबाहेर काढण्यात आले. या अपघातात दोनच पवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील नंदिनी बडदे यांच्या हाताला, तर जितेंद्र रेमजे यांच्या डोक्याला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेची माहिती आगारपमुख रणजित राजेशिर्के यांना समजताच ते घटनास्थळी गेले होते. केनच्या मदतीने एसटी बस रस्त्यावर आणण्यात आली. एसटीसह टँकरचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर टँकर चालकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले.









