रत्नागिरी :
रत्नागिरी–हातखंबा रस्त्यावरील कारवांचीवाडी येथे एसटी–कारमध्ये झालेल्या अपघातात कारमधील मायक्रो फायनान्स कंपनीच्या मॅनेजरचा मृत्यू झाल़ा ही घटना गुऊवारी सकाळी 7.30 च्या सुमारास घडल़ी विकास नौसर (34, ऱा मुंबई) असे मृताचे नाव आह़े विकास हा आपल्या चार सहकाऱ्यांसोबत मुंबई येथून रत्नागिरीत कंपनीच्या बैठकीसाठी येत होत़ा अपघातात विकास याच्या एका सहकाऱ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आह़े.
स्वस्ती या मायक्रो फायनान्स कंपनीचे युनिट मॅनेजर विकास नौसर हे सहकारी चार कर्मचाऱ्यांसोबत कारमधून (एमएच-04 एलएच 1678) बुधवारी मध्यरात्री 12 वाजता मुंबई–चेंबूर येथून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. गुऊवारी सकाळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला ते उपस्थित राहणार होते. कारवांचीवाडी येथील रस्त्यावरील डायव्हर्शन न कळल्यामुळे समोऊन येणाऱ्या एसटीला कारची धडक बसल़ी या अपघातामध्ये विकास यांना गंभीर दुखापत झाली तर एकजण किरकोळ जखमी झाला. उपचारासाठी दोघांनाही जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. विकास नौसर हे गाडीत चालकाच्या मागील सीटवर बसले होत़े त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कर्मचाऱ्यावर ऊग्णालयात उपचार सुऊ आहेत. ग्रामीण पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्त कार आणि बसची पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, कारवांचीवाडीतील रस्त्यावर असलेले डायव्हर्जन गाडी चालकाच्या लक्षात आले नाही. ज्यामुळे ही समोरासमोर टक्कर झाली. गाडीतील इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील बदललेल्या मार्गामुळे हा अपघात घडला. ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- बैठकीसाठी येत होते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
स्वस्ती फायनान्स ही मायक्रो फायनान्स क्षेत्रातील एक कंपनी आहे. रत्नागिरी, चिपळूण व कणकवली येथे या कंपनीच्या शाखा कार्यरत असून ठाणे येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. तळागाळीत गरजू लोकांना कर्ज पुरवठा करणे, हे या कंपनीचे उद्दिष्ट असले तरी काही दिवसापासून मायक्रो फायनान्स कंपन्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. जिह्यातील अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कर्जाच्या वसुलीसाठी चुकीच्या पद्धती वापरल्याचा आरोप आहे. कर्जदारांना छळले जात असल्याचा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी या कपन्यांवर कडक कारवाई आदेश दिले होते. या संदर्भात स्वस्ती फायनान्ससह इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.








