ऑनलाईन टीम/तरुण भारत
एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करण्यात यावे अशा मागणीसाठी गेले कित्येक दिवसांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. शासकीय सेवेत विलिनीकरण व्हावे यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचा संप सूरू आहे. हायकोर्टाच्या समितीने एसटी विलिनीकरणाबाबतचा अहवाल सादर केला आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलिनीकरण करणं शक्य नाही असे अहवालात सांगण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळात या अहवालावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. हायकोर्टाच्या त्रिसदस्यी समितीने हा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे.
दरम्यान, राज्यातील एसटी कर्मचारी शासनात एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. राज्य सरकार या मागणीवर सकारात्मक आहे. तसेच त्रिसदस्यीय समितीला अहवाल तयार करण्यास हायकोर्टाने सांगितले होते. अहवास सादर करण्यात आला आहे. विलिनीकरण करणं शक्य नाही असे स्पष्ट झाल्यामुळे एसटी विलिनीकरणाचा तिढा सुटणार का? संप अजूनही संपूर्ण मिटला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पुढील भूमिका काय घेणार हे स्पष्ट झाले नाही.