वृत्तसंस्था/ लखनौ
येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया महिलांच्या 21 वर्षाखालील वयोगटाच्या हॉकी लिग स्पर्धेतील सहाव्या दिवशी साई शक्ती (एसएस), खालसा हॉकी अकादमी अमृतसर (केएचए), एचएआर हॉकी अकादमी (एचएचए) आणि प्रितम सिवाच स्पोर्ट्स फौंडेशन (पीएसएसएफ) यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवला.
पहिल्या सामन्यात साई शक्तीने एचआयएम अकादमीचा 8-2 अशा गोल फरकाने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात खालसा हॉकी अकादमी अमृतसरने सॅल्यूट हॉकी अकादमीचा 5-1 असा फडशा पाडला. तिसऱ्या सामन्यात एचएआर हॉकी अकादमीने साई बाल संघावर पेनल्टी शुटआऊटमध्ये 5-4 अशी मात केली. चौथ्या सामन्यात प्रितम सिवाच स्पोर्ट्स फौंडेशनने स्पोर्ट्स हॉस्टेल ओडिशाचा 3-2 असा पराभव केला.









