मालिकावीर फरदीन काजी दुचाकीचा मानकरी : उपविजेता शौर्य स्पोर्ट्स कपिलेश्वर
बेळगाव : भवानी नगर येथील दोस्ता स्पोर्ट्स क्लब व वरदराज स्पोर्टस क्लब यांच्या संयुक्त विद्दमाने आयोजित वरदराज चषक हाफ पिच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने शौर्य स्पोर्ट्सचा 5 धावांनी पराभव करून वरदराज चषक पटकाविला. सामनावीर व मालिकावीर वसंत शहापूरकर याला गौरविण्यात आले. भवानीनगर येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एस. आर. एस हिंदुस्थान संघाने 6 षटकात 3 गडी बाद 49 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना शौर्य स्पोर्ट्स संघाने 6 षटकात 7 गडी बाद 44 धावा केल्या. हा सामना एसआरएस हिंदुस्थाने 5 धावानी जिंकला. सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला एस. आर. एस. हिंदुस्थान संघाचा वसंत शहापूरकर, मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज एस. आर. एस. हिंदुस्थान संघाचा शिवराज हिरोजी, मालिकावीर वसंत शहापूरकर, उत्कृष्ट फलंदाज शौर्य स्पोर्ट्सचा अझर अश्रपी यांना प्रमुख पाहुणे राजेश जाधव, आकाश पाटील, सारंग राघोजी, संपत राघोजी, प्रथमेश कावळे, उमेश, गणेश बस्तवाडकर हस्ते श्रीराम सेना हिंदुस्थान या संघाल प्रथम पारितोषिक 51,000 रुपये रोख चषक तर उविजेत्या शौर्यला 25,000 रुपये देऊन गौरविण्यात आले. एसआरएसचे नेतृत्व उमेश बाळू कुऱ्याळकर तर शौर्य स्पोर्ट्स या संघाचे नेतृत्व मोशीन खान हे करीत आहेत.









