वार्ताहर /पणजी
अनघा वाचा सुंदर प्रतिष्ठान पर्वरी या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्थरीय मराठी कथाकथन व बालगीत गायन या स्पर्धांमध्ये कुजिरा बांबोळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार प्राथमिक विद्यालयातील कु. श्रीशक्ती पवार (इ.4थी) व चि. गौतम कर्पे (इ.2री) या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले.
इयत्ता 3री व 4थी च्या मुलांसाठी आयोजित केलेल्या संतकथा विभागात कु. श्रीशक्ती पवार हिने द्वितीय बक्षिस पटकावले. तर इयत्ता 1ली व 2री च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या बालगीत गायन स्पर्धेत चि. गौतम कर्पे यानी दुसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात शिक्षणतज्ञ श्री. रमेश पानसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, पालक-शिक्षक संघातर्फे कौतुक होत.









