वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी वेगवान गोलंदाज तसेच आयसीसीच्या इलाईट पॅनेलमधील सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांचा भारत – नेपाळ यांच्यात सोमवारी सुरु असलेला सामना 250 वा वनडे आहे. श्रीनाथ यांनी आपल्या पंचगिरीच्या कारकीर्दीत 250 सामन्यात सामनाधिकारी म्हणून यशस्वी टप्पा गाठला आहे.
जवागल श्रीनाथ यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 68 कसोटीत 236 तर 229 वनडे सामन्यात 315 गडी बाद केले आहेत. 2003 साली आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघामध्ये श्रीनाथचा समावेश होता. यानंतर 2007 पासून त्यांनी आयसीसीच्या सामनाधिकारी भूमीका निभावण्यास प्रारंभ केला. क्रिकेट क्षेत्रातील पंचगिरीच्या विभागात 250 वनडे सामन्यात सामनाधिकारी म्हणूक कामगिरी बजावणारे श्रीनाथ हे चौथे पंच आहेत. यापूर्वी रजंन मधुगुले, ख्रिल ब्रॉड आणि जेफ क्रॉ यांनी हा पराक्रम केला होता. 17 वर्षांच्या पंचगिरी कालावधीत श्रीनाथ हे आयसीसीचे यशस्वी सामनाधिकारी म्हणून ओळखले जातात.









