एका गाण्यातून झळकणार अभिनेत्री
अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा द राइज’ला लोकप्रियता मिळवून देणारा आयटम नंबर ‘ऊ अंटावा’ प्रचंड गाजले हेते. आता या चित्रपटाचा सीक्वेल ‘पुष्पा द रुल’ चित्रपटासाठी दिग्दर्शन सुकुमार एका नव्या सुंदर अभिनेत्रीला संधी देणार आहेत. सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटद्वारे निर्माण होणाऱ्या या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्यासोबत जगपति बाबू तसच प्रकाश राज यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

रक्तचंदनाच्या तस्करीची पार्श्वभूमी असलेला चित्रपट पुष्पाची कहाणी यावेळी वेगळी असणार आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील चर्चेनुसार ‘पुष्पा द रुल’ चित्रपटातील विशेष गाण्यासाठी नव्या चेहऱ्याची निवड केली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारी उदयोन्मुख अभिनेत्री श्रीलीलाचे नाव यात सर्वात आघाडीवर आहे.
संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाती जवळपास सर्व गाणी तयार केली आहेत. तसेच या गाण्यांच्या अन्य भाषांमधील आवृत्तींवरही काम सुरू आहे. यातील आयटम साँग देखील तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. या गाण्यावर श्रीलीला ही अभिनेत्री आकर्षक नृत्य करताना दिसून येण्याची शक्यता आहे. श्रीलीलाने पवन कल्याण यांचा चित्रपट ‘उस्ताद भगत सिंह’, महेश बाबूचा चित्रपट ‘गुंटूर कारम’ काम केले आहे. तसेच विजय देवरकोंडासोबत ती एका चित्रपटात दिसून येणार आहे









