बॉबी देओलही असणार मुख्य भूमिकेत
रणवीर सिंह सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘धुरंधर’च्या तयारीत व्यग्र आहे. तर रणवीर आता बॉबी देओलसोबत एका बिगबजेट चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात श्रीलीला ही दाक्षिणात्य अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहे. रणवीर आणि श्रीलीला ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
सध्या या चित्रपटातील अन्य कलाकारांची नावे अद्याप उघड करण्यात आलेली नाहीत. हा चित्रपट निव्वळ करमणूकप्रधान असल्याचे मानले जात अहे. यात अॅक्शन, ड्रामा आणि स्टार पॉवरचे मिश्रण दिसून येणार आहे. रणवीरने या चित्रपटाची देखील तयारी सुरू केली आहे. रणवीरचा धुंरधर हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर तो डॉन 3 चित्रपटात काम करत आहे.
तर श्रीलीला ही सध्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री ठरली आहे. अनुराग बासूकडून दिग्दर्शित रोमँटिक म्युझिकल चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरीही सध्या याला आशिकी 3 असे नाव दिले जात आहे.









