पूजा हेगडेने गमाविला चित्रपट
पवन कल्याण यांचा आगामी चित्रपट ‘उस्ताद भगत सिंह’ मागील काही काळापासून चर्चेत आहे. अलिकडेच या चित्रपटाचे चित्रिकरण रोखण्यात आले होते. आता या चित्रपटातील मुख्य नायिकेसंबंधी मोठी माहिती समोर आली आहे. पूर्वी या चित्रपटात पूजा हेगडेची नायिका म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु ती आता या चित्रपटातून बाहेर पडली असून तिच्याजागी श्रीलीलाला मुख्य अभिनेत्री म्हणून संधी देण्यात
आली आहे. उस्ताद भगत सिंह या चित्रपटाचे चित्रिकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पवन कल्याण हे निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने या चित्रपटाचे चित्रिकरण यापूर्वी रोखण्यात आले होते.
कला दिग्दर्शक आनंद साई आणि त्यांच्या पथकाने या चित्रपटासाठी एक मोठा सेट तयार केला आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, नवाब शाह, केजीएफ फेम अविनाश गौतमी, नर्रा श्रीनु, नागा महेश आणि टेम्पर वामसी हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाची कथा अन् दिग्दर्शनाची जबाबदारी हरीश शंकर यांनी पेलली आहे. या चित्रपटाची निर्मिती नवीन यरनेनी आणि वाय. रविशंकर यांच्याकडून करण्यात येणार आहे. चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांचे संगीत लाभणार आहे.









