वृत्तसंस्था / चीन
भारतीय बास्केटबॉल संघाने बुधवारी येथे झालेल्या गट अ च्या शेवटच्या सामन्यात ताहितीला 78`-55 असे हरवून एफआयबीए महिला आशिया कप 2025 डिव्हीजन बी च्या उपांत्य फेरीच्या पात्रता फेरीत प्रवेश केला.
ऑलिम्पिक.कॉम नुसार शेन्झेन बे स्पोर्ट्स सेंटर याथ्s खेळल्या गेलेल्या सामन्यात 15 गुण, सहा रिबऊंड्स आणि पाच असिस्टसह श्रीकला राणी भारताची सर्वोत्तम कामगिरी करणारी खेळाडू होती. मोइना मिशेल तुइइनुई-ले बेहेरेक (15 गुण आणि 10 रिबाऊंड्स) हिने दुहेरी कामगिरी केली आणि स्पर्धेत ताहितीची उत्कृष्ट खेळाडू होती. श्रीकला राणीने दोन गुणांच्या ले-अपसह स्कोअरिंगची सुरुवात केली. परंतु एफआयबीए बस्केटबॉल रँकिंगमध्ये जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर असलेला भारत सुरुवातीला एक्सचेंजमध्ये आपले वर्चस्व गाजवू शकला नाही. कारण अक्रमांकित ताहिती एकमेकांशी बरोबरी करत होती. तथापि, 15-12 असा स्कोअर झाल्यामुळे परिस्थिती बदलली. त्यानंतर भारताने 10 अनुत्तरीत गुण मिळवले आणि पहिल्या क्वर्टर हॉटरमध्ये 25-13 अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाने हाफटाइमपर्यंत आपली आघाडी 46-25 पर्यंत वाढवली आणि त्यानंतर तिसऱ्या सत्रातही बरोबरीचा निकाल लागला आणि 61-40 असा स्कोअर झाला. भारत, तथापि, शेवटच्या क्वार्टरमध्ये विजय मिळवत भारातने विजय मिळविला. या विजयामुळे, भारताने गट अ मध्ये पाच गुणांसह दुसरे स्थान पटकाविले. चायनीज तैपेईने दिवसाआधी कझाकस्तानला 91-47 असा पराभव करुन अव्वल स्थान मिळविले आणि उपांत्य फेरीत थेट प्रवेश केला. दरम्यान भारतीय बास्केटबॉल संघ शुक्रवारी एफआयबीए महिला आशिया कप 2025 डिव्हिजन बी सेमीफायनल क्वालिफायरमध्ये गट ब मधील तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना करेल.
चार वर्षांच्याअनुपस्थितीनंतर भारत एफआयबीए महिला आशिया कपमध्ये परतत आहे. 2021 मध्ये डिव्हिजन अ मधून बाहेर पडल्यानंतर त्यांना 2023 च्या आवृत्तीत खेळता आले नाही आणि आता या वर्षीच्या कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपमध्ये डिव्हिजन ब मध्ये भाग घेत आहेत. 31 व्या एफआयबीए महिला आशिया कपच्या डिव्हिजन ब मध्ये दोन गटांमध्ये विभागलेले एकूण 8 संघ भाग घेत आहेत. भारताचा गट ए मध्ये कझाकस्थान, चीन तैपेई आणि ताहिती यांच्यासह ड्रॉ झाला. राऊंड रॉबिन सामन्यानंतर, गटातील दोन अव्वल संघ थेट उपांत्य फेरीत पात्र ठरतात. दरम्यान प्रत्येक गटातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांनी उपांत्य फेरीच्या पात्रता फेरीमध्ये प्रवेश केला. ज्यामुळे उपांत्य फेरीतील इतर दोन स्थाने निश्चित होतात. शेवटी डिव्हिजन ब फायनल जिंकणाऱ्या संघाला पुढील आवृत्तीसाठी डिव्हिजन अ









