वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने ती किमान सहा आठवडे खेळापासून दूर राहणार आहे. यामुळे 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेला तिला मुकावे लागणार आहे.
‘मला स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला सहा आठवडे विश्रांती घ्यावी लागणार असल्याचे मला खेदाने सांगावे लागत आहे. यामुळे दुर्दैवाने मला अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही,’ असे श्रीजाने म्हटले आहे. जागतिक क्रमवारीत ती सध्या 21 व्या स्थानावर आहे. यूटीटीमध्ये ती जयपूर पॅट्रियट्स संघाकडून खेळणार होती. तिच्या जागी आता राष्ट्रीय कनिष्ठ चॅम्पियन नित्याश्री मणीला संघात स्थान देण्यात आले आहे.









