विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी करणार भारताचे प्रतिनिधीत्व
बेळगाव : फ्रान्स येथे होणाऱ्या विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी बेळगावचा श्रीधर निंगाप्पा माळगी हा भारतीय संघातून फ्रान्सला रवाना झाला आहे. श्रीधर माळगी याने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत 50 व 100 मी. फ्रीस्टाईल, 400 मी. फ्रीस्टाईल व 100 मी. बटरफ्लाय या प्रकारात केलेली उत्तम कामगिरीची दखल घेवून फ्रान्स येथे होणाऱ्या विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघामधून तो प्रतिनिधीत्व करणार आहे. यापूर्वीही श्रीधरने अनेक जलतरण स्पर्धेतून उत्तम कामगिरी बजावली होती. गतवर्षीही त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेवून चमक दाखविली होती. याची खडतर मेहनत त्यामुळेच त्याला जलतरण स्पर्धेत यश मिळत आहे. दोन्ही सत्रात जोमात सराव करत असल्याने त्याला यश मिळत आहे. सिंगापूर येथे विश्व पॅरा जलतरण त्याच प्रमाणे एशियन पॅरा जलतरण स्पर्धा 2026 मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली आहे. श्रीधर शिवाय भारतीय संघात 8 जलतरणपटूंचा समावेश असून त्यांच्या सोबत प्रशिक्षक संजय बिस्त हे देखील रवाना झाले आहेत. श्रीधर हा जी स्वीम अकादमी बेंगळूर येथे सराव करीत असून शरत गायकवाड व उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









