अभिनेते आशिष पवार व विनय नलावडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती
मालिकेत काम करण्याची महिलांना मिळणार संधी
सावंतवाडी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील वेतोबा देवस्थानची महती आता टीव्ही मालिकेतून दिसणार आहे . क्षेत्रफळ श्रीदेव वेतोबा ही नवी मालिका इतिहास 17 जुलै पासून सन मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या देवस्थानावर आधारित असलेली ही मालिका आगळ्यावेगळ्या स्वरूपात असून आतापर्यंतच्या टीव्ही वरील मालिकांचे चित्रपटासारखे प्रमोशन करणारी ही पहिलीच मालिका ठरली आहे. या मालिकेचे प्रमोशन सावंतवाडीत 17 जुलैला सायंकाळी सात वाजता वैश्य भवन येथे होणार आहे . आनंदी सोहळा या धर्तीवर या मालिकेची सुरुवात होणार आहे या आनंदी सोहळ्यामध्ये ज्या महिला आपले परफॉर्म्स दाखवतील त्यांना सिरीयल मध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती या मालिकेचे आणि आनंद सोहळ्याचे निवेदक अभिनेते आशिष पवार व विनय नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वैभव केकरे उपस्थित होते. हॉटेल मॅंगो मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अभिनेते श्री पवार म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील मुलांमध्ये अभिनयाचे टॅलेंट आहे मात्र, हे टॅलेंट आम्ही शोधून काढणार आहोत यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात छोट्या मुलांना एकत्र करून एक नाटक सादर केले जाणार आहे. आणि भजन कीर्तनाच्या धरतीवर येथील मुलांना पुढे आणले जाणार असल्याचेही ते म्हणाले. कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अध्यात्मिक वारसा वेगळा आहे येथील देव देवस्थानचे महती फार मोठी आहे आरवली वेतोबा देवस्थान ची महती असणारी मालिका सन मराठी वाहिनेवर 17 जुलैपासून सुरू होत आहे . सिंधुदुर्ग व रत्नागिरी या कोकणातील भागात जवळपास 27 शो चे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 15 व रत्नागिरीतील 12 शो भागांचे चे चित्रीकरण होणार आहे असे ते म्हणाले. आतापर्यंत एखादी मालिका सुरू होताना या मालिकेत विशेष कार्यक्रम व कलाकार एकत्र येऊन आनंदी सोहळा साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सावंतवाडी मोती तलावाच्या काठी 17 जुलैला सायंकाळी पाच वाजता आरती करून त्यानंतर वैश्य भवन येथे सर्व महिलांना एकत्रित करून एक आनंदी सोहळा केला जाणार आहे. या सोहळ्यात उपस्थित महिला गायन- गीत- नक्कल आदी उपक्रम करू शकतात. तसेच क्षेत्रफळ श्री देव वेतोबा मालिकेतील निर्माते दिग्दर्शक व सर्व कलाकार या आनंदी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. असा अनोखा आनंदी सोहळा कार्यक्रम होणार आहे. तरी या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे श्री नलावडे यांनी स्पष्ट केले.









