मसुरे प्रतिनिधी
Sri Swami Samarth Math Anniversary from 26th April!
मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त २६ ते २७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १०:३० वा प्रायश्चित्त शांतीपाठ, गणेशपुजन, पुण्याह वाचन, नांदिश्राध्द, आचार्य वरण, प्राकरशुध्दी, देवता स्थापना, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना, दत्तमाला मंत्र जप, ग्रहयज्ञ, लघुपूर्णाहूती, आरती,दुपारी १ ते ३:३० महाप्रसाद, संध्याकाळी ७ वा आरती, रात्री ८ वा भजने. २७ एप्रिल २०२३ सकाळी ८ ते दुपारी १शांतीपाठ, प्राकरशुध्दी, स्थापित देवतापूजन, श्री स्वामी समर्थ दत्तायाग,
बलीदान पुर्णाहुती, अभिषेक, आरती, गा-हाणे. दुपारी १ ते ३:३० – महाप्रसाद,संध्याकाळी ७ वा आरती, रात्री ८ वा भजने.उपस्थीतीचे आवाहन अध्यक्ष श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मसुरे (मर्डेवाडी) यांनी केले आहे.









