वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या सुरू असलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये लंकेचा फिरकी गोलंदाज विजयकांत वियासकांतचा समावेश करण्यात आला आहे. या संघातील लंकन खेळाडू हसरंगा दुखापतीने त्रस्त झाल्याने त्याच्या जागी विजयकांतला घेण्यात आले आहे.
22 वर्षीय विजयकांत हा लंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज असून, त्याने आतापर्यंत केवळ एका टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. पण त्याला आता हैदराबाद संघाने थेट बदली खेळाडू म्हणून प्रवेश दिला आहे. हैदराबाद संघाने विजयकांतला 50 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. हैदराबाद संघाने लंकेच्या हसरंगाला या स्पर्धेसाठी मोठ्या रकमेवर खरेदी केले होते. गेल्यावर्षी हैदराबादने हसरंगाला 1.5 कोटी रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले होते.









