वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या शिस्तपालन नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन आयसीसीने लंकेचा क्रिकेटपटू प्रवीण जयविक्रमावर एक वर्षांसाठी बंदी घातली आहे.
आयसीसीच्या शिस्तपालन समितीने या निर्णयाची घोषणा नुकतीच केली. लंका प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत खेळताना जय विक्रमाकडून शिस्तपालन नियमाचे उल्लंघन झाले होते. त्यानंतर या प्रकरणाविरुद्ध जयविक्रमाने दाद मागण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान सुनावणीवेळी जयविक्रमाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.









