वृत्तसंस्था/ कोलंबो
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी लंकेने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून चरिथ असालंकाकडे या संघाचे नेतृत्व सोपविले आहे. या मालिकेत दोन वनडे सामने होणार आहेत.
या मालिकेतील हे दोन सामने बुधवारी व शुक्रवारी येथील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जातील. ऑस्ट्रेलिया संघ गेल्याच महिन्यात लंकेत दाखल झाला असून त्याने दोन कसोटींची मालिकाही एकतर्फी जिंकली आहे. लंकेचा वनडे संघ : चरिथ असालंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, कमिंदू मेंडिस, जनिथ लियानगे, निशान मदुश्का, नुवानिदू फर्नांडो, वनिंदू हसरंगा, महीश थीक्षना, दुनिथ वेलालगे, जेफ्री व्हांडरसे, असिता फर्नांडो, लाहिरू कुमारा, मोहम्मद सिराझ, इशान मलिंगा.









