बेळगाव : कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना मान्यताप्राप्त मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित 19 व्या श्री गणेश आंतरराज्य शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या प्रशांत खन्नुकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर श्रीगणेश हा मानाचा किताब पटकाविला. तर बेळगावच्या निखिल दंडगलकरने पहिले उपविजेतेपद पटकाविले. गोव्याच्या एस.खानने उत्कृष्ट पोझरचा किताब मिळविला. रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली कर्नाटक, गोवा व कोल्हापूर जिल्हा मर्यादित आंतरराज्य श्री गणेश शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 55 किलो, 60, 65, 70, 75, 80 व 80 वरील सात वजनी गटात घेण्यात आली. जवळपास 125 हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे
- 55 किलो गट : 1) आकाश निंगराणी (बेळगाव), 2) ए. प्रभाकर (बेंगळूर), 3) विशाल येळ्ळूरकर (बेळगाव), 4) शाहनूर (कोल्हापूर), 5) लक्ष्मण एस.(बागलकोट),
- 60 किलो गट : 1) सोमशेखर कारवी (उडुपी), 2) मंजुनाथ सोनटक्की (बेळगाव, 3) रोहित एम. (बेळगाव), 4) आकाश निंबाळकर (कोल्हापूर), 5) बसवराज (दावणगिरी),
- 65 किलो गट : 1) नितिन एम.एस. (शिमोगा), 2) आदित्य काटकर (बेळगाव), 3) आकाश गडकरी (बेळगाव), 4) संजय जाधव (कोल्हापूर), 5) राजु शेडशलकर (कोल्हापूर),
- 70 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 2) ए. खान (गोवा), 3) तुषार गडकरी (बेळगाव), 4) आदित्य यमकनमर्डी (बेळगाव), 5) वरद परब (गोवा),
- 75 किलो गट : 1) जॉनी डिसोजा (गोवा), 2) नागेंद्र माडीवाल (बेळगाव), 3) सर्वनन एच. (बेंगळुर), 4) आकाश सोनूले (कोल्हापूर), 5) बसवणय्या एस.जी..(बेळगाव),
- 80 किलो गट : 1) प्रशांत खन्नुकर (बेळगाव), 2) प्रसाद बाचीकर (बेळगाव), 3) श्रीधर माने (कोल्हापूर), 4) कुमार रेडेकर (कोल्हापूर), 5) अजय देसाई (गोवा),
- 80 किलोवरील गट : 1) निखिल दंडगलकर (बेळगाव), 2) मंजुनाथ एस. (दावणगिरी), 3) गिरीष मायगिरी (द.प.रेल्वे), 4) आर. टी. सत्यनारायण (द.प.रेल्वे), 5) विसाल गावडे (कोल्हापूर) यानी आपल्या गटात विजेतेपद मिळविले.
त्यानंतर श्रीगणेश किताबासाठी आकाश निंगराणी, सोमशेखर कारवी, नितिन एम.एस., प्रताप कालपुंद्रीकर, जॉनी डिसोजा, प्रशांत खन्नुकर, निखिल दंडगलकर यांच्यात लढत झाली. त्यामध्ये प्रशांत खन्नुकर. जॉनी डिसोजा व निखिल दंडगलकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. पण आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर बेळगावच्या प्रशांत खन्नुकरने श्री गणेश चॅम्पियन ऑफ चम्पियन हा मानाचा किताब पटकाविला. तर निखिल दंडगलकरला पहिले उपविजेतेपद मिळाले. उत्कृष्ट पोझरच्या लढतीत गोव्याच्या एस. खानने बाजी मारत पुरस्कार पटकाविला. विजेत्याना प्रमुख पाहुणे उद्योजक शिरीष गोगटे, अविनाश पोतदार, दिलिप चिंडक, सुहास चिंडक, रिहाज चौगुला, अमित किल्लेकर, मिलिंद पाटणेकर, राजेश हंगिरगेकर, सचिन हंगिरगेकर, पवन हंगिरगेकर, नितीन हंगिरगेकर, अजित सिद्दण्णावर, प्रदीप सिद्दण्णावर, दयानंद बाळेकुंद्री, जे. डी. भट्ट, अनिलकुमार जैन, मोतीचंद दोरकाडी, शमशेर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून जे. डी. भट्ट, बाप्पा गोवा, गडम कोल्हापूर, ओम सातपुत्ते इचलकरंजी, कुशगल हुबळी, अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, एम. के. गुरव, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, कृष्णा चिक्कतूंबल, सुनील अष्टेकर, राजु नलवडे, गजानन हंगिरगेकर यांनी काम पाहिले.









