प्रतिनिधी
बांदा
डिंगणे येथील श्री देवी सातेरी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 29 डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त सकाळपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे फेडणे, रात्री देवीची पालखी मिरवणूक, त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी व डिंगणे ग्रामस्थ यांनी केले आहे.









