प्रतिनिधी / बांदा
Sri Devi Mauli Panchayat Anniversary at Wafoli on 5th May
वाफोली येथील श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण वर्धापनदीनानिमित्त सग्रह श्री सूक्त विधान श्री सत्यनारायण महापूजा, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी 5 मे रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी 8 वाजता गणपतीपूजन, प्रायश्चीत विधी, देवतांना नारळ विडे, पुण्याहवाचन, प्रधान देवता स्थापन पूजन, श्रीसूक्त जपाभिषेक, देवता होमहवन, कुमारिका पूजन, बलिदान, पूर्णाहुती, सत्यनारायण महापूजा, दुपारी 2 वाजता महानैवेद्य, महाआरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद, तिर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजता ग्रामस्थांची सुश्राव्य भजने व रात्री ठीक 10 वाजता श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारिवडे यांचा कालचक्र हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानीक सल्लागार उपसमिती वाफोलीचे अध्यक्ष विलास गवस, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था, मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.









