हवेत लटकलेल्या अवस्थेत केला मेकअप
महिलांना मेकअप करणे किती पसंत असते हे प्रत्येकाला माहित असावे. एखाद्या समारंभात जायचे असल्यास महिला खूप अगोदरपासून तयार होण्यास सुरुवात करतात, जेणेकरून मेकअप वेळेत पूर्ण करता येईल. महिलांना रेल्वेस्थानक-विमानतळाच्या वॉशरुमपासून कार्यालयांमधील वॉशरुममध्ये महिलांना मेकअप करताना पाहिले असेल, परंतु एखाद्या महिलेला 10 हजार फुटांच्या उंचीवर मेकअप करताना पाहिले आहे का? सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक महिला आकाशात लटकलेल्या स्थितीत मेकअप करताना दिसून येते.

मॅकेना नाइप एक व्हिडिओ क्रिएटर असून तिला स्कायडायव्हिंगचा मोठा छंद आहे. ती स्वत:च्या इन्स्टाग्राम अकौंटवर स्काय डायव्हिंगचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते. अलिकडेच तिने पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मॅकेना हवेत मेकअप करताना दिसून येते. तुमचे स्कीन केयर रुटीन काय आहे असे तिने या व्हिडिओच्या कॅप्शनदाखल नमूद केले आहे.
हवेत लटकलेल्या स्थितीत असताना मॅकेना स्वत:च्या कंबरेला टांगलेल्या बॅगेतून एक-एक सामग्री बाहेर काढत मेकअप करताना दिसून येते. तिच्या चेहऱ्यावर यादरम्यान भीतीचा लवलेशही दिसून आला नाही. ही कामगिरी करताना तिला जणू मजाच वाटत होती. मध्ये-मध्ये रुमालाद्वारे ती स्वत:चा चेहरा पुसत होती.
या व्हिडिओला 5 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कॉमेंट केली आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून विश्वासच बसत नव्हता. त्यांना हा व्हिडिओ फेक वाटत होता.









