वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोर्तुगालमधील माईया येथे झालेल्या विश्व अॅथलेटिक्स खंडीय अॅथलेटिक टूरवरील स्पर्धेत भारताचा अॅथलिट मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीमध्ये सुवर्णपदक मिळविले.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुषांच्या लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकरने 7.75 मी. ची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात त्याने पहिल्या प्रयत्नात 7.63 मी. ची नोंद केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्याने 7.75 आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्याने 7.69 मी. ची नोंद केली. येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या टोकियोतील विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी श्रीशंकर पात्रतेसाठी झगडत आहे. श्रीशंकरने इंडियन खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत या क्रीडा प्रकारात 8.05 मी. ची नोंद केली होती. श्रीशंकरने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते.









