Kolhapur : कोल्हापुरात रस्त्यांवरील खड्यांचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत आता स्पीड ब्रेकरचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील रहदारीच्या ठिकाणी मोठाले स्प्रीड बेकर आहेत, मात्र त्यावर पिवळे पट्टे नाहीत. रात्रीच्यावेळी हे स्पीड बेकर न दिसल्याने वयस्कर लोक आणि महिलांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काल कोल्हापुरात रात्रीच्यावेळी एका आजोबांचा अपघात झाला.अपघाताची माहिती पालिकेला मिळताच कालच रात्री पालिकेने पांढरे पट्टे मारले होते. मात्र सकाळी हे पट्टे गायब झाल्याचे पाहायला मिळाले. रात्रीतून पट्टे कोठे गायब झाले असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. आता कोल्हापुरात स्प्रीड बेकरच्या पट्ट्यांची चर्चा रंगली आहे.

दसरा चौकातून खानविलकर पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन स्पीडब्रेकर आहेत.पण एकाही स्पीडब्रेकर पांढरे पट्टे नाहीत.त्यामुळे याठिकाणी दररोज एक तरी अपघात होतोच.काल पुन्हा अपघात झाला आणि रात्री पालिकेचे कर्मचारी धावत पांढरे पट्टे मारायला आले.पण रात्री मारलेले पट्टे सकाळी गायब झालेले पाहायला मिळाले.











