1951 ते 2018… भारताची ‘सोनेरी’ पानं !
भारत…‘आशियाई खेळां’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावलेला हा देश…1978 मध्ये स्थापन झालेल्या अन् या स्पर्धांचे नियमन करणाऱ्या महासंघाच्या संस्थापकांपैकी एक…या खेळांची सुरुवात झाली तीच मुळी नवी दिल्लीतून. 1951 मध्ये आशियाई खेळ सुरू झाल्यापासून दर चार वर्षांनी (अपवाद दुसऱ्या स्पर्धेचा) होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत सहभागी झालेला भारत त्याच्या शक्तिस्थानांपैकी, वैशिष्ट्यांपैकी एक राहिलाय हे कुणीही नाकारू शकणार नाही…
हिल्या आशियाई खेळांत भारतानं कमाई केली ती 51 पदकांची. जपानच्या (60 पदकं) मागं आपल्याला त्यावेळी दुसरं स्थान प्राप्त झालं होतं. पदकतालिकेतील क्रमवारीचा विचार करता ‘एशियाड’मधील ही आपली सर्वोत्तम कामगिरी…1951 च्या आशियाई खेळांत भारताला पहिला सुवर्णपदक विजेता प्राप्त झाला होता तो जलतरणात हे कित्येकांना आज सांगूनही खरं वाटणार नाही. जलतरणपटू सचिन नागनं 100 मीटर फ्रीस्टाईल स्पर्धा जिंकून ही कामगिरी नोंदविली होती. आशियाई खेळांतील जलतरणात आपल्या हाती लागलेलं ते एकमेव सुवर्ण. त्याचवेळी रोशन मिस्त्राrनं 100 मीटर स्प्रिंटमध्ये रौप्यपदक पटकावून या खेळांमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरत इतिहासात आपलं नाव कोरलं होतं…तेव्हापासून भारतानं या स्पर्धेत एकूण 672 पदकं आपल्या खात्यात जमा केलीत…
भारत आजपर्यंतच्या स्पर्धांतून सुवर्णपदकांशिवाय कधीही परतलेला नाहीये. एकंदरित पाहता आशियाई खेळांतील सर्वांत यशस्वी देशांमध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि इराण यांच्या पाठोपाठ आपल्या वाट्याला येतं ते पाचवं स्थान…यात आघाडीवर राहिलेत ते आपले ‘ट्रॅक अँड फिल्ड’चे अॅथलीट. त्यांनी 18 स्पर्धांतून तब्बल 254 पदकांची लयलूट केलीय. ‘ट्रॅक अँड फिल्ड’मधील या यशाला आणखी वेगळ्या उंचीवर नेलं ते ‘स्प्रिंट लेजंड’ मिल्खा सिंग नि ‘पयोली एक्सप्रेस’ म्हणून विख्यात असलेल्या पी. टी. उषानं. आशियाई खेळांतील सर्वांत यशस्वी भारतीय खेळाडू म्हणून उल्लेख करावा लागेल तो उषाचाच. तिनं तिच्या गौरवशाली कारकीर्दीत चार सुवर्ण व सात रौप्यपदकांसह एकूण 11 पदकं खिशांत घातली…
आशियाई खेळांत भारतानं सर्वाधिक 70 पदकं जिंकली ती मात्र 2018 मध्ये अन् 20 पदकांनिशी त्यात सर्वांत मोठा वाटा उचलला तो स्वाभाविकपणे अॅथलेटिक्सनं…पदकांची कमाई करण्याच्या बाबतीत अॅथलेटिक्सच्या व्यतिरिक्त कुस्तीपटू, बॉक्सर आणि अगदी अलीकडे नेमबाजांनीही उत्कृष्ट योगदान दिलंय. यात विशेष उल्लेख करावा लागेल तो कुस्तीपटू बजरंग पुनिया नि विनेश फोगट, बॉक्सर मेरी कोम व विजेंदर सिंग अन् नेमबाज अभिनव बिंद्रा, जसपाल राणा यासारख्यांचा… मात्र भारताचं सर्वाधिक वर्चस्व दिसून आलंय ते कब•ाrत. 1990 मध्ये आशियाई खेळांत पदार्पण केल्यापासून कब•ाrच्या पुरुष गटातील आठपैकी सात स्पर्धांची जेतेपदं आपण खेचून आणलीत. याला एकमेव अपवाद राहिला तो 2018 चा…जकार्तात इराणनं दोन्ही विभागांत भारतीय संघांना नमविलं. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये कब•ाrचा किताब पुन्हा खात्यात जमा करण्यास भारत विलक्षण उत्सुक असेल !
1951 : पहिल्या आशियाई खेळांमध्ये सहभाग राहिला होता तो केवळ 11 राष्ट्रांचा…त्यावेळी गोव्याचे दिग्गज अॅथलीट लेव्ही पिंटोंनी 100 मीटर्स नि 200 मीटर्स शर्यतीत सुवर्ण, तर पुरुषांच्या 4×100 मीटर्स रिलेमध्ये रौप्य मिळवून स्पर्धा गाजविली…सचिन नाग (जलतरण) तसंच रणजित सिंग (800 मीटर्स), निक्का सिंग, (1500 मीटर्स), छोटा सिंग (मॅरेथॉन), महावीर प्रसाद (10 हजार मीटर चालणे) आणि बख्तावर सिंग (50 किलोमीटर चालणं) या सर्वांनी अव्वल स्थान मिळविलं. खेरीज मदन लाल नि माखन सिंग यांनी गोळाफेक व थाळीफेकमध्ये पहिलं सुवर्ण मिळवून दिलं…पुऊषांच्या ‘वॉटर पोलो’ संघानं देशाचं पहिलं अन् एकमेव सुवर्ण तसंच के. पी. ठक्करनं 3 मीटर स्प्रिंगबोर्ड आणि 10 मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग स्पर्धेत सुवर्णपदकं, तर पुऊषांच्या फुटबॉल संघानं आशियाई खेळांतील पहिलं सुवर्ण जिंकलं तेही त्याचवेळी…
1954 : आजपर्यंतची आशियाई खेळांतील देशाची सर्वांत वाईट कामगिरी नोंदविली गेली ती यावेळी…सर्वण सिंग (110 मीटर हर्डल्स), अजितसिंग भल्ला (उंच उडी), आणि प्रद्युम्नसिंग ब्रार (गोळाफेक, थाळीफेक) हेच तेवढे सुवर्णपदक मिळवून मायदेशी परतू शकले…
1958 : ‘फ्लाईंग शीख’ मिल्खा सिंगनं सर्वांत वेगवान आशियाई क्रीडापटू म्हणून आपलं स्थान मजबूत करताना 200 मीटर्स आणि 400 मीटर्स शर्यतींत सुवर्णपदक मिळविलं. त्याशिवाय मोहिंदर सिंगनं तिहेरी उडीत पहिलं सुवर्ण प्राप्त करून दिलं…
1962 : पदम बहादूर मल्ल हा बॉक्सिंगमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय, तर गुरबचनसिंग रंधावा डेकॅथ्लॉनमधील सुवर्णपदकाचा पहिला मानकरी ठरला…
1966 : भारतीय पुऊष राष्ट्रीय हॉकी संघानं प्रथमच सुवर्णपदकावर डल्ला मारला, तर अजमेर सिंगनं 400 मीटर्स शर्यतीत सुवर्ण पटकावलं. मात्र 200 मीटर्समध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं…
1970 : पी. के बॅनर्जीच्या फुटबॉल संघानं यावेळी मिळविलेल्या कांस्यपदकानंतर भारताला कधीही पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही…कमलजीत संधू (400 मीटर्स) ही वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली…
1974 : भारताला अकरापैकी आठ सुवर्ण अॅथलेटिक्समध्ये हाती लागली. रामास्वामी ज्ञानशेखरननं 100 मीटर्समध्ये सुवर्ण आणि 200 मीटर्समध्ये रौप्यपदक, तर हरी चंदनं 5000 मीटर्स आणि 10000 मीटर्स अशा दोन्ही प्रकारांत सुवर्ण पटकावलं…
1978 : टी. सी. योहानननं लांब उडीतील संस्मरणीय सुवर्णपदक मिळविताना मारलेल्या 8.07 मीटरच्या उडीनं नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम तीन दशकांहून अधिक काळ अबाधित राहिला…रणधीर सिंग हा नेमबाजीच्या ट्रॅप प्रकारात सुवर्ण मिळवणारा पहिला भारतीय ठरला…
1982 : आशियाई खेळांचं यजमानपद 31 वर्षांनी भारतात परतलं अन् त्याचबरोबर रंगीत दूरचित्रवाणी संचानं दाखल होत क्रांती घडविली…स्पर्धेत पदार्पण केलेल्या घोडेस्वारीत रघुबीर सिंग व ऊपिंदर सिंग ब्रार यांनी जिंकलेली वैयक्तिक सुवर्णपदकं, सांघिक गटात प्राप्त झालेलं अव्वल स्थान, नौकानयनात फारोख तारापोर आणि जरीर करंजिया यांनी मिळविलेला पहिला क्रमांक, महिला हॉकीनं केलेलं पदार्पण आणि भारतीय महिला हॉकी संघानं जिंकलेलं सुवर्ण तसंच गोल्फच्या पदार्पणातच लक्ष्मण सिंगनं जमा केलेलं वैयक्तिक सुवर्ण अन् भारतीय संघानं पटकावलेलं सांघिक सुवर्णपदक ही या स्पर्धेची खास वैशिष्ट्यां…
1986 : पी. टी. उषानं अॅथलेटिक्समध्ये 5 पदकं जिंकली. त्यापैकी 4 सुवर्ण 200 मीटर्स, 400 मीटर्स, 400 मीटर्स हर्डल्स आणि 4×400 मीटर्स रिलेमध्ये पदरात पाडताना तिनं आशियाई खेळांतील सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र 100 मीटर्समध्ये रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं…
1990 : पदार्पण केलेल्या कब•ाrमध्ये वर्चस्वाची सुऊवात होऊन भारतानं सुवर्णपदक खात्यात जमा केलं…
1994 : लिएंडर पेसनं पुऊष एकेरीत कांस्यपदक अन् गौरव नाटेकरसमवेत दुहेरीत टेनिसमधलं पहिलं सुवर्ण मिळवून दिलं…
1998 : बिलियर्ड्सचा प्रवेश होऊन अशोक शांडिल्यनं एकेरीमध्ये आणि गीत सेठीसमवेत दुहेरीत अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ज्योतिर्मयी सिकदरनंही 800 मीटर्स नि 1500 मीटर्स शर्यतींत दोन सुवर्णपदकं पटकावली…
2002 : सुनीता राणीनं 1500 मीटर्समध्ये केलेला विक्रम, अंजू बॉबी जॉर्जनं महिलांच्या लांब उडी स्पर्धेत मिळविलेलं सुवर्ण, सोमा बिस्वासनं मिळवून दिलेलं पहिलं ‘हेप्टॅथलॉन’ पदक अन् यासिन मर्चंट व रफत हबीब यांनी स्नूकरमध्ये दुहेरी गटात मिळवून दिलेलं या प्रकारातील पहिलं नि एकमेव सुवर्ण ही भारताची कमावती बाजू राहिली…
2006 : सानिया मिर्झा रौप्यपदकासह टेनिसमधील वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली, तर कोनेरू हंपीनं बुद्धिबळमध्ये (महिला वैयक्तिक-रॅपिड) ऐतिहासिक सुवर्ण जिंकून दिलं…
2010 : बजरंगलाल तखरनं रोईंगमध्ये पटकावलेलं पहिलं सुवर्ण, सुधा सिंगनं 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय ठरण्याचा मिळविलेला मान आणि महिला गटातील कब•ाr स्पर्धेच्या पहिल्याच वर्षात भारतीय संघानं कमावलेलं सुवर्णपदक ही यावर्षीची खास वैशिष्ट्यां ठरली…
2014 : मेरी कोम ‘फ्लायवेट’ गटातून (51 किलो) बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली…प्रियांका पवार, टिंटू लुका, मनदीप कौर आणि माचेत्तीरा राजू पूवम्मा यांच्या संघानं महिलांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक मिळविताना विक्रम मोडीत काढला. तर भारतीय तिरंदाजी संघानं पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत पहिलं सुवर्ण मिळविलं…
2018 : भारतानं प्रथमच 70 पदकांचा टप्पा पार केला…नीरज चोप्रा 88.06 मीटरच्या राष्ट्रीय विक्रमासह भालाफेकीत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बनला…महिलांमध्ये स्वप्ना बर्मननं जिंकलेलं हेप्टॅथ्लॉनमधील सुवर्णपदक हे भारताचं पहिलंवहिलं, तर पी. व्ही. सिंधूनं मिळविलेलं रौप्य ही बॅडमिंटनमधील भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी. त्याशिवाय सायना नेहवालनं कांस्यपदक पटकावलं…राही सरनोबत (25 मीटर रॅपिड-फायर पिस्तूल) ही नेमबाजीत, तर विनेश फोगट (महिला फ्रीस्टाइल 50 किलो गट) ही कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली….एशियाडमध्ये पदार्पण केलेल्या ब्रिजमध्ये प्रणव वर्धन आणि शिवनाथ सरकार या जोडीनंही सुवर्णपदकाची कमाई केली…धावपटू हिमा दासनं जिंकलेली तीन पदकं (महिलांच्या तसंच मिश्र 4×400 मीटर्स रिलेमध्ये सुवर्णपदकं अन् 400 मीटर्स शर्यतीत रौप्य) ही आणखी एक खासियत…
भारताची ‘एशियाड’मधील कामगिरी…
- आयोजक शहर साल सुवर्ण रौप्य कांस्य एकूण पदकं क्रमांक
- नवी दिल्ली 1951 15 16 20 51 2
- मनिला 1954 5 4 8 17 5
- टोकियो 1958 5 4 4 13 7
- जकार्ता 1962 10 13 10 33 3
- बँकॉक 1966 7 3 11 21 5
- बँकॉक 1970 6 9 10 25 5
- तेहरान 1974 4 12 12 28 7
- बँकॉक 1978 11 11 6 28 6
- नवी दिल्ली 1982 13 19 25 57 5
- सेऊल 1986 5 9 23 37 5
- बीजिंग 1990 1 8 14 23 11
- हिरोशिमा 1994 4 3 16 23 8
- बँकॉक 1998 7 11 17 35 9
- बुसान 2022 11 12 13 36 7
- दोहा 2006 10 17 26 53 8
- गुआंगझाऊ 2010 14 17 34 65 6
- इंचॉन 2014 11 10 36 57 8
- जकार्ता 2018 16 23 31 70 8
राजू प्रभू
चीनमधील हांगझाऊ येथील ‘आशियाई खेळां’साठी यावेळी भारतानं 655 क्रीडापटूंची सर्वांत मोठी तुकडी पाठविलेली असून 40 क्रीडा प्रकारांत आपला सहभाग राहील…पदकांच्या बाबतीत ’अब की बार, सौ पार’ ही ‘कॅचलाईन’ असून चार वर्षांपूर्वी इंडोनेशियात नोंदविलेला उच्चांक मोडीत काढण्याकामी सर्वांत जास्त भर राहील तो अॅथलेटिक्सवर…
- भालाफेक : अॅथलेटिक्समध्ये भारताकडे 25 वर्षीय ऑलिम्पिक आणि विश्वविजेता नीरज चोप्राइतका सुवर्णपदकासाठी दुसरा सर्वोत्तम दावेदार नाही. 2018 मध्ये जिंकलेल्या सुवर्णाची पुनरावृत्ती नीरजच्या हातून लीलया घडू शकते…गेल्या महिन्यात आपल्या पहिल्या जागतिक स्पर्धेत 84.77 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम भालाफेक केलेला किशोर जेना हाही पदकाचा दावेदार असेल…
- गोळाफेक : 28 वर्षीय तजिंदरपाल सिंग तूरकडून 2018 मध्ये जिंकलेलं सुवर्णपदक राखून ठेवलं जाण्याची अपेक्षा आहे. वैयक्तिक स्पर्धांचा विचार करता तो एकमेव आशियाई विक्रमधारक भारतीय…
- लांब उडी : मुरली श्रीशंकरपुढं जागतिक स्पर्धेतील निराशाजनक प्रदर्शनातून बाहेर सरून मोठी झेप घेण्याचं ध्येय असेल. वैयक्तिक आणि हंगामातील सर्वोत्कृष्ट 8.41 मीटर्सच्या उडीनं त्याला जगात चौथ्या स्थानावर आणि आशियात सहकारी जेस्विन अॅल्ड्रिनच्या मागं दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवलंय…या प्रकारातील दुसरं आशादायी नाव म्हणजे अॅल्ड्रिन. मोसमाच्या सुऊवातीला 8.42 मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदविलेला हा लांब उडीपटू आशियात आघाडीवर अन् जगात तिसऱ्या क्रमांकावर विसावलाय हे विसरून चालणार नाहीये…
- तिहेरी उडी : मोसमात आशियाई खेळाडूंत अग्रणी राहिलेला आणि राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या 17.37 मीटर्सच्या उडीसह जगात सहाव्या क्रमांकावर पोहोचलेला 22 वर्षीय प्रवीण चित्रवेल हाही पदकाचा भक्कम दावेदार…
- 1500 मीटर्स शर्यत : अजयकुमार सरोज हा विद्यमान आशियाई विजेता अन् या हंगामात खंडातील दुसरी सर्वोत्तम वेळ नोंदविणारा धावपटू. ऑगस्टमधील जागतिक स्पर्धेत त्यानं 3 मिनिटं 38.24 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली…
- 3000 मीटर स्टीपलचेस : अविनाश साबळे हा पदकाचा भक्कम दावेदार. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या साबळेच्या खात्यात 8 मिनिटं 11.20 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम आहे. तो आशियाई धावपटूंत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय…महिला गटात अपेक्षांचा भार पेलेल ती राष्ट्रीय विक्रमधारक अन् आशियात दुसऱ्या क्रमांकावर विसावलेली पारुल चौधरी…
- 4×400 मीटर रिले : जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत 2 मिनिटं 59.05 सेकंदांचा आशियाई विक्रम करणारा पुऊषांचा 4×400 मीटर रिलेमधील चमू सुवर्णपदकाचा दावेदार आहे. जुलैमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत तो दुसऱ्या स्थानावर राहिला…4×400 मीटर रिलेतील महिलांचा चमू पूर्वीइतका प्रबळ नसला, तरी पदक जिंकू शकतो. कारण या मोसमात आशियात तो पहिल्या क्रमांकावर राहिलाय…याशिवाय मिश्र 4×400 मीटर रिलेतील चमूनं 2018 च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. यंदा झालेल्या आशियाई स्पर्धेतील शर्यतही जिंकल्यानं त्यांच्याकडून त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल…
- 100 मीटर हर्डल्स : 24 वर्षीय राष्ट्रीय विक्रमधारक ज्योती याराजी ही या शर्यतीतील देशाची पहिली आशियाई विजेती असून तिनं जुलैमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं…
- 400 मीटर हर्डल्स : या मोसमात आशियात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली विथ्या रामराज ही पदकांची महत्त्वपूर्ण दावेदार असून तिचा अलीकडील 55.43 सेकंदांचा प्रयत्न पी. टी उषाच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा सेकंदाच्या शंभराव्या भागानं कमी पडला…
- हेप्टॅथ्लॉन : या प्रकारात स्वप्ना बर्मन ही पदकाची मोठी दावेदार असून ती आपलं गतवेळचं विजेतेपद राखून ठेवण्याचं ध्येय बाळगून असेल…
शनिवारपासून औपचारिकपणे सुरू होणाऱ्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंकडून पदकाच्या आशा आहेत. विशेषत: कब•ाr, क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी या क्रीडांमध्ये पदकाच्या अपेक्षा आहेत.
- बॅडमिंटन : भारताला ज्या खेळांत मोठी आशा आहे त्यामध्ये समावेश होतो तो बॅडमिंटनचा…पुऊष एकेरेत एच. एस. प्रणॉयनं यंदा मलेशिया मास्टर्स, ऑस्ट्रेलियन ओपनची जेतेपदं अन् गेल्या महिन्यात जागतिक स्पर्धेचं कांस्यपदक खात्यावर जमा केलंय…दुहेरीतील सात्विकसाईराज रनकीरे•ाr-चिराग शेट्टी जोडीनंही ‘इंडियन ओपन सुपर 500’, राष्ट्रकुल खेळांची जेतेपदं, टोकियोतील जागतिक स्पर्धेतील कांस्यासह ‘इंडोनेशिया ओपन’चा किताब मिळवून दबदबा निर्माण केलाय…भारताच्या थॉमस चषक जेतेपदाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णपदकाचे संभाव्य मानकरी म्हणून आपल्याकडे पाहिलं गेल्यास त्यात नवल नाही…
- क्रिकेट : विश्वचषकामुळं ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील दुय्यम संघ पाठवावा लागला असला, तरी इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खचितच त्याचं पारडं भारी…दुसरीकडे, भारतीय महिला संघाची गणितं पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपलब्धतेमुळं जरी बिघडू शकत असली, तरीही त्यांच्याकडे पाहिलं जातंय ते सुवर्णपदकाचे भक्कम दावेदार म्हणूनच…
- हॉकी : टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय पुऊष हॉकी संघ आशियाई खेळांत सुवर्ण जिंकण्याच्या दृष्टीनं सर्वांत दमदार दावेदार म्हणायला हवा. जागतिक क्रमवारीत लाभलेलं तिसरं स्थान आणि सध्याचा फॉर्म पाहता हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल स्थान मिळवू शकला नाही, तर ती मोठी निराशा ठरेल…पुऊष संघाप्रमाणं सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील महिला हॉकी संघ हा देखील सुवर्णपदकाचा एक महत्त्वपूर्ण दावेदार. जगात सातव्या स्थानावर असलेला हा चमू आशियात सर्वोच्च क्रमांकावर विसावलाय…
- नेमबाजी : गेल्या वर्षी कैरोत मिळविलेलं विश्वविजेतेपद विचारात घेता 19 वर्षीय ऊद्रांक्ष पाटील (10 मीटर एअर रायफल) अन् कनिष्ठ विश्वविजेती मनू भाकरकडूनही (25 मीटर स्पोर्ट्स पिस्तूल) चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल…
- स्क्वॉश : पुरुषांमध्ये एकेरीत दुसरं मानांकन लाभलेला सौरव घोषाल, तर महिलांमध्ये 19 वेळची राष्ट्रीय विजेती ज्योश्ना चिन्नप्पा ही महिला एकेरीत पदक मिळविण्याच्या दृष्टीनं भारताची सर्वोत्तम दावेदार असेल. तर मिश्र दुहेरीत भार असेल तो दीपिका पल्लीकल व हरिंदरपाल संधूवर…
- टेबल टेनिस : आपल्या पाचव्या एशियाडमध्ये उतरणारा शरथ कमल, जी. साथियान आणि हरमीत देसाई यांचा समावेश असलेल्या पुरुष संघानं जकार्तात ऐतिहासिक कांस्यपदक मिळवलं होतं. या तिघांनी यंदा आशियाई स्पर्धेतही कांस्य पटकावून दाखविलेलं असल्यानं त्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील. 2018 मध्ये मिश्र दुहेरीही भारतानं शरथ व मनिका बत्रा यांच्या माध्यमातून आश्चर्यकारकरीत्या कांस्यपदक मिळवलं होतं. यावेळी बत्राची जोडी जमणार ती साथियानसोबत…
- टेनिस : 43 व्या वर्षीही रोहन बोपण्णाकडून पुरुष दुहेरीचं विजेतेपद राखलं जाण्याची अपेक्षा आहे. गेल्या स्पर्धेत त्यानं दिविज शरणसोबत सुवर्ण जिंकलं होतं…
- कुस्ती : गतवर्षी 23 वर्षांखालील जागतिक नि आशियाई स्पर्धा अन् यंदा आशियाई स्पर्धा जिंकलेला अमन सेहरावत (पुऊषांचा 57 किलो गट), तर महिलांमध्ये अंतिम पांघल (महिलांचा 57 किलो गट) यांच्यावर लक्ष असेल. पांघल लागोपाठ कनिष्ठ जागतिक जेतेपदं जिंकणारी देशातील पहिली महिला कुस्तीपटू…
- वेटलिफ्टिंग : मीराबाई चानूच्या पदकांच्या यादीत फक्त आशियाई खेळांतील पदक नसून यावेळी ही उणीव भरून काढण्याच्या दृष्टीनं तिनं भरपूर कंबर कसलीय…
- तिरंदाजी : यंदा जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केल्यानं भारतीय कंपाऊंड संघ फार्मात आलाय. ओजस देवतळे, अदिती स्वामी, ज्योती सुरेखा वेण्णम तसंच अभिषेक वर्मा, प्रथमेश जावकर यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील…
- बॉक्सिंग : यात पदकाची सर्वांत जास्त संधी आहे ती तेलंगणच्या निखत झरीनला. दोन विश्व अजिंक्यपदं, दोन स्ट्रँडजा मेमोरियल किताब आणि राष्ट्रकुल खेळांत सुवर्णपदक पटकावलेल्या झरीननं गेल्या दोन वर्षांत ‘फ्लायवेट’ गटात (51 किलो) जबरदस्त वर्चस्व गाजविलंय…टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून दाखविलेल्या लवलिना बोरगोहेनचा मूळ गट ‘मिडल वेट’ (69 किलो) राहिलेला असला, तरी नवीन 75 किलो वजनी गटात आशियाई आणि विश्व स्पर्धा जिंकल्यानं तिचा आत्मविश्वास वाढलाय…पुऊषांमध्ये लक्ष असेल ते पहिल्यांदाच आशियाई खेळांत उतरणाऱ्या दीपक भोरियावर (51 किलो)…











