भारतीय हॉकीची ‘ग्रेट वॉल’…श्रीजेश!
भारतीय हॉकी संघ म्हटल्यावर जसं आता कर्णधार हरमनप्रीत सिंगचं नाव समोर येतं तसाच आणखी एक चेहरा हमखास आठवतो तो पी. आर. श्रीजेशचा…अनेक वेळा तो देशाच्या कामी आलेला असून त्याच्या अभेद्य वाटणाऱ्या गोलरक्षणामुळं आज संघ निर्धास्त होऊन खेळू शकतोय. भारतातीलच नव्हे, तर जगातील अव्वल गोलरक्षकांमध्ये या केरळच्या खेळाडूचा समावेश होतोय… केरळ…या राज्याचं नाव घेतल्यावर डोळ्यांसमोर हमखास आधी येईल तो फुटबॉल अन् त्यानंतर अॅथलेटिक्स…अशा परिस्थितीत एक 12 वर्षांचा मुलगा जेव्हा थिऊवनंतपुरममधील प्रसिद्ध जी. व्ही. राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये दाखल झाला तेव्हा आपण नक्की कुठला खेळ निवडावा हेच त्याला कळेनासं झालं…धावण्यापासून सुरुवात केलेल्या त्या मुलानं आपल्या गोळाफेकीतील कामगिरीच्या जोरावर पुढं पसंती दिली ती त्याच खेळाला. पण तेथील इतर गोळाफेकपटूंना पाहिल्यावर त्यानं ती कल्पना लगेच शीतपेटीत टाकली. ‘बाकीच्यांकडे पाहून मला जाणवलं की, मी त्यांच्या जवळपासही पोहोचत नाही अन् त्यात कधीच करिअर करू शकणार नाही’, तो म्हणतो…
त्यानंतर तो व्हॉलीबॉलकडे वळला…पण तेव्हा साडेचार ते पाच फूट उंचीच्या त्या मुलाला जाणवलं की, त्या खेळातही त्याच्या वाट्याला संधी कमीच येईल…राहता राहिला पर्याय तो फुटबॉलचा. परंतु केरळमधील या खेळाच्या समृद्ध इतिहासानं त्याला परावृत्त केलं. ‘केरळमध्ये कानाकोपऱ्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचा समूह सापडेल. त्यामुळं मी त्या खेळातूनही पाय मागं घेतला’, तो सांगतो…मग त्याला शेजारच्या शेतात मुलं व मुली काठीचा वापर करून चेंडू फटकावण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. ‘ते मूलभूत गोष्टी शिकत होते. म्हणून मी तिथं गेलो आणि त्यात हात आजमावून पाहिला, मजा आली. हा खेळ देखील तसा सोपा नव्हता, त्यात काही अडचणी होत्या. पण ते मजेशीर वाटलं’, तो सुरुवातीच्या आठवणी जागवताना म्हणतो… पुढं त्यानं हॉकीमध्येच आपली कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेत गोलरक्षणावर इतकं प्रभुत्व मिळवलं की, आज तो नुसता भारताच्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट गोलरक्षकांच्या रांगेत जाऊन बसलेला नाही, तर जगातील अव्वल गोलरक्षकांमध्ये त्याची गणना होतेय…परात्तू रवींद्रन श्रीजेशची ही कहाणी म्हणजे चुकून निवडलेलं क्षेत्रही एकेकदा कसं कुठल्या कुठं पोहोचवून जातं त्याचं अत्यंत प्रभावी उदाहरण…श्रीजेशचा उदय नि त्याची भरारी हॉकीसाठी कधीही विख्यात नसलेल्या केरळची क्रीडाक्षेत्रातील प्रतिमा सुद्धा बदलून गेल्याशिवाय राहिलेली नाही…
8 मे, 1986 रोजी एर्नाकुलम जिह्यातील किझाक्कंबलम गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीजेशला हॉकीकडे वळण्यास मदत केली ती जी. व्ही. राजा स्पोर्ट्स स्कूलमधील जयकुमार नि रमेश कोलाप्पा या प्रशिक्षकांनी. लवकरच तो शालेय संघासाठी खेळताना दिसू लागला अन् त्याचं सुदैव म्हणजे तत्कालीन कनिष्ठ राष्ट्रीय हॉकी संघाचे प्रशिक्षक अन् पुढं वरिष्ठ संघाची जबाबदारी सांभाळलेले हरेंद्र सिंग यांच्या नजरेत तो 14 वर्षांखालील स्पर्धेत खेळताना भरला…2004 साली पी. आर. श्रीजेश ऑस्ट्रेलियाविऊद्ध राष्ट्रीय कनिष्ठ संघातून भारतीय हॉकीच्या विश्वात दाखल झाला. त्या स्पर्धेदरम्यान दाखविलेलं गोलरक्षणाचं कौशल्य काही महिन्यांतच त्याला वरिष्ठ संघात स्थान मिळवून देण्यास पुरेसं ठरलं…
श्रीजेशनं वरिष्ठ भारतीय हॉकी संघात पाऊल ठेवलं ते 2006 मध्ये कोलंबो इथं झालेल्या दक्षिण आशियाई खेळांतून. तिथं त्याचं गोलरक्षण चांगलं राहिलं आणि संपूर्ण स्पर्धेत त्यानं संघाला अनेक गोलांपासून वाचविलं. असं असलं, तरी कारकिर्दीच्या सुऊवातीच्या काळात श्रीजेशची कामगिरी सर्वसाधारण, अपरिपक्वतेचं दर्शन घडविणारी राहिली अन् त्यामुळं बदली खेळाडू म्हणूनच उतरण्याची, नियमितपणे राखीव खेळाडूंसाठीच्या बाकावर बसण्याची पाळी आली. या पार्श्वभूमीवर काही वेळा प्रभावी कामगिरी करूनही त्याला 2011 पर्यंत खूप संघर्ष करावा लागला…
हे चित्र बदललं ते 2011 पासून…त्या वर्षाच्या ‘आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेतील पाकिस्तानविऊद्धच्या अंतिम सामन्यात पी. आर. श्रीजेशनं अडविलेले दोन ‘पेनल्टी स्ट्रोक’ त्याला राष्ट्रीय ‘स्टार’ बनवून गेले. त्यानंतर 2013 सालच्या ‘आशिया चषका’तील भारताच्या विजयात देखील श्रीजेशनं बजावलेली महत्त्वाची भूमिका त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कार देऊन गेली…तेव्हापासून त्यानं मागं वळून पाहिलेलं नाही…श्रीजेश हे नाव पुढं इतक्या झपाट्यानं चमकत गेलं, उत्तरोत्तर त्याची कामगिरी इतकी बहरत गेली की, तो भारतीय हॉकी संघाचा नुसता अविभाज्य भागच बनला नाही, तर त्याला चक्क ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं!
कारकिर्दीतील मोलाचे टप्पे…
- 2014 : दक्षिण कोरियाच्या इंचॉन इथं झालेल्या ‘आशियाई खेळां“मधील भारताच्या यशात श्रीजेशच्या मैदानावरील निर्णयक्षमतेनं फार महत्त्वाची भूमिका बजावली. तिथं आपल्या हॉकी संघानं कमाई करून दाखविली ती सुवर्णपदकाची…त्याच वर्षाच्या उत्तरार्धात भारताला वाट्याला ‘चॅम्पियन्स ट्रॉफी“मध्ये तिसरं स्थान आलं असलं, तरी जर्मन नि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मागं टाकून स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून बाजी मारली ती त्यानंच…शिवाय त्याच्या खात्यात आणखी एक यश जमा झालं ते ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकाच्या रुपानं…
- 2016 : श्रीजेशनं ‘चॅम्पियन्स ट्रॉफी“ तसंच ‘रिओ ऑलिम्पिक“मध्ये आपल्या कौशल्याचं पुरेपूर दर्शन घडविलं. त्यामुळं ‘टीम इंडिया“ला ‘चॅम्पियन्स ट्रॉफी“मध्ये उपविजेतेपद पटकावण्यास मोलाची मदत झाली, तर ऑलिम्पिकमध्ये मजल मारली गेली ती उपांत्यपूर्व फेरीपर्यंत…दिग्गज मिडफिल्डर सरदार सिंगनं कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व करण्याच्या बाबतीत सर्वोत्तम पर्याय म्हणून उभरलं ते पी. आर. श्रीजेश हेच नाव. भारत ‘चॅम्पियन्स ट्रॉफी“ तसंच ‘ऑलिम्पिक“मध्ये त्याच्याच अधिपत्याखाली खेळला. परंतु ‘चॅम्पियन्स ट्रॉफी“नंतरच्या काही स्पर्धांमध्ये संघाला चांगल्या कामगिरीचं दर्शन घडविता न आल्यानं त्याची जागा सोपविण्यात आली ती मनप्रीत सिंगकडे…
- 2018 : ‘ब्रेडा चॅम्पियन्स ट्रॉफी“मध्ये उपविजेतेपद अन् जकार्ता येथील ‘आशियाई खेळां“त कांस्यपदक जिंकणाऱ्या संघातून श्रीजेशनं पुन्हा एकदा मैदानावरील आपली कार्यक्षमता सिद्ध केली…
- 2020 : तीन ऑलिम्पिकमध्ये झळकलेल्या पी. आर. श्रीजेशच्या कारकिर्दीतील एक मोलाचा टप्पा म्हणजे टोकियो ऑलिम्पिक. त्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना गोल करण्याचे प्रतिस्पर्ध्यांचे किमान 40 प्रयत्न उधळवून लावले. त्यावर सरताज म्हणजे जर्मनीविरुद्धचा सामना संपण्यास सात मिनिटं असताना त्यानं अडविलेला 13 वा पेनल्टी कॉर्नर. त्याच्या जोरावर तो पुन्हा एकदा ‘राष्ट्रीय नायक“ बनल्याशिवाय राहिला नाही. कारण त्यामुळं भारताचा 5-4 अशा फरकानं विजय पक्का होण्याबरोबर ऑलिम्पिकमधील हॉकीतल्या पदकाची 41 वर्षांपासून चाललेली प्रतीक्षाही संपुष्टात येत कांस्यपदक पदरात पडलं…
- 2021-22 : अनुभवी श्रीजेशनं 2022 च्या ‘राष्ट्रकुल“ खेळांत भारतानं जिंकलेल्या रौप्यपदकात अन् ‘प्रो लीग 2021-22“मध्ये मिळविलेल्या तिसऱ्या स्थानातही महत्त्वाची भूमिका बजावली…
300 सामन्यांच्या पार…
- पी. आर. श्रीजेश नुकत्याच झालेल्या ‘आशियाई चॅम्पियन्स ट्राफी’तील उपांत्य फेरीत भारतीय संघातर्फे आपला 300 वा सामना खेळला. त्यानिमित्त त्याला ‘हॉकी इंडिया’नं विशेष ‘पॅप’ बहाल केली. यावेळी श्रीजेशनं हॉकी स्टीकसह झुकून संघाला अभिवादन केलं. त्याविषयी बोलताना नंतर तो म्हणाला, ‘आज मी जो काही आहे अन् जिथं आहे तो संघामुळं. जेव्हा गरज होती तेव्हा पाठिंबा दिल्याबद्दल आणि मदत केल्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे होते’…मग संघानंही त्याला भेट दिली ती जपानवरील 5-0 अशा दणदणीत विजयाची अन् नंतर मलेशियाला नमवून ‘चॅम्पियन्स’ चषकाची…
- 2021 साली श्रीजेशची ‘वर्ल्ड गेम्स अॅथलीट ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली. हा पुरस्कार जिंकणारा तो देशातील फक्त दुसरा खेळाडू…
- 2021-22 मध्ये ‘आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघा’नं श्रीजेशला सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून घोषित केलं…
- 2021 सालीच त्याला प्रदान केला तो देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ पुरस्कार…त्यापूर्वी 2015 मध्ये ‘अर्जुन पुरस्कार’, तर 2017 साली ‘पद्मश्री’ बहाल करून त्याला भारत सरकारनं सन्मानित केलं होतं…
गोलरक्षणच का निवडलं?
पी. आर. श्रीजेशनं गोलरक्षकच बनणं का पसंत केलं त्याची कहाणी विलक्षण रोचक…केरळमधील जी. व्ही. राजा स्पोर्ट्स स्कूलमध्ये हॉकीचा नुकताच परिचय होत असताना त्यानं पाहिलं की, काही खेळाडू एका कोपऱ्यात उभे होते. ‘त्या सर्वांनी पॅड्स परिधान केलेली होती अन् ते चेंडूला लाथाडत होते. मला कधीही धावणं आवडत नसे. म्हणून माझ्यासाठी हे सर्वोत्तम काम ठरेल असं मला वाटलं. कारण यात धावण्याची जास्त गरज नव्हती. अशा प्रकारे मी माझं करिअर निवडलं’, श्रीजेश सांगतो…
राष्ट्रीय हॉकीपटू ते आंतरराष्ट्रीय पंच एक ध्येयनिष्ठ भरारी : रमा पोतनीस
रमाची कामगिरी इतर महिला, पुऊष खेळाडूंसाठी अनुकरणीय, पंचगिरीत करीअरचा शोधला मार्ग
कोल्हापुरात कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, नेमबाजी, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेनिस या खेळाला खूप प्रतिष्ठा आहे. हॉकी हा खेळसुद्धा तळमळीने खेळला जातो. शाळा, महाविद्यालय व क्लबच्या माध्यमातून तीन ते चार हजार महिला व पुऊष खेळाडू हॉकीच्या स्पर्धा खेळत आहे. मात्र स्पर्धा पाहण्यासाठी अपेक्षित गर्दी होत नाही. अशा काहीशा दुर्लक्षीत हॉकी लाभण्यामागे कोल्हापूरची हॉकीपटू रमा पोतनीसने राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आपली वेगळी प्रतिष्ठा जनमानसात तयार केली. हॉकी खेळणे थांबवल्यानंतर रमाने देश-विदेशातील हॉकी स्पर्धांमध्ये पंचगिरी करण्यापर्यंतची मुसंडी मारली. शालेय संघासह महाराष्ट्र संघातून विविध स्पर्धांमध्ये तिने कर्णधारपदाची धुरा सांभाळत संघाला सामने जिंकून दिले आहेत. खेळाची आवड, मैदानात मेहनत करण्याची जिद्द आणि करीअरच्या दृष्टीने डोळ्यासमोर ठेवलेले लक्ष्य या त्रिसुत्रीवर कॉन्सन्ट्रेशन केले तर त्याचा फायदा खेळाडूला होतो, हे रमाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या कृतीमुळेच ती देश व जगाच्या पटलावर चमकत आहे. शिवाय तिची ही कृती फक्त हॉकीतीलच नव्हे तर प्रत्येक खेळातील नव्या व जुन्या महिला, पुऊष खेळाडूंसाठी अनुकरणीय अशीच ठरली आहे.
खेळाडूने एखाद्या खेळाला वाहून घेतले की तो कसा चमकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून रमा पोतनीसकडे पाहता येईल. रमा ही सधन कुटुंबात जन्मलेली मुलगी. कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये (सीबीएसई) चौथीपर्यंत शिकत असताना ती जिम्नॅस्टीकचा सराव करत होती. पाचवीत गेल्यानंतर तिने हॉकीच्या सरावाला मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये सुऊवात केली. येथूनच तिच्या यशाचा आलेख तयार होण्यास सुऊवात झाली. हॉकी प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक अशा दोन्ही भूमिका निभावणारे रणजित इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी स्टीक कशी धरायची, चेंडू कसा मारायचा, चेंडूला स्टीकशी चिकटून ठेवत विऊद्ध संघावर गोलसाठी चाल कशी करायची हे शिकू लागली. रोजच्या रोज जसे ती सरावाचे धडे घेऊ लागली तसे तिच्या नसानसात हॉकी भिनू लागली. ती चांगली हॉकीपटू बनू शकते, शिवाय हॉकीसाठी लागणारे टॅलेंट तिच्यात आहे हे तिच्याकडून हॉकीचा सराव कऊन घेणारे स्कूलचे क्रीडा शिक्षक रणजित इंगवले यांना दिसून आले. त्यामुळेच त्यांनी तिला कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या 14 वर्षाखालील मुलींच्या संघात स्थान मिळाले. या संघातून तिने दोनदा राज्यस्तरीय व पश्चिम विभागीय सीबीएसई 14 वषाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले. तसेच स्कूलच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघातूनही एकदा राज्य व पश्चिम विभागीय स्पर्धा खेळण्याची संधी तिला मिळाली. इतकेच नव्हे तर सीबीएसईअंतर्गंतच झालेल्या 3 राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळून तिने मैदान गाजवले. 2007 ते 2010 या कालावधीत वरील सहाही स्पर्धा झाल्या. यापैकी पाच स्पर्धांमध्ये तिला बेस्ट प्लेअर म्हणून निवडण्यात आले. या सहाही स्पर्धांमध्ये सेंटर हाफला खेळताना रमाने फॉरवर्डच्या खेळाडूंना विऊद्ध संघावर गोल नोंदवण्यासाठी दिलेल्या उत्तम पासची दखल घेऊन तिला बेस्ट प्लेअर म्हणून गौरवले हे विशेषच म्हणावे लागले. 2010 साली तर रमाच्या खेळावर खुष झालेल्या सीबीएसई गेम्स कमिटीने तिला प्रतिष्ठेचा चाचा नेहऊ एक्सलन्सी अॅवॉर्डने गौरवले. न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असताना रमा मैदानातील फॉरवर्डच्या प्लेसला खेळू लागली.
जवाहरलाल नेहऊ राष्ट्रीय 17 वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत तीने हॉकीतील अंगभूत कौशल्य दाखवत दर्जेदार खेळ कऊन दाखवला. तिच्या खेळाची दखल घेऊन तिला प्लेअर ऑफ दी मॅच या बहुमानाने गौरवले. हरियाणांमध्ये स्कूल नॅशनल गेम्सअंतर्गत झालेल्या 19 वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत रमातील हॉकी टॅलेंट खऱ्या अर्थाने सिद्ध करणारी ठरली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना तिने तब्बल 12 गोल करण्याचा पराक्रम केला. त्याची दखल घेऊन तिला स्पर्धेतील बेस्ट फॉरवर्ड म्हणून गौरवले. शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालयाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धा खेळल्यानंतर ती महिलांच्या खुल्या गटातील स्पर्धा खेळू लागली. हैदराबादेत झालेल्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी तिला महाराष्ट्र संघातून खेळण्याची संधी मिळाली. मात्र या स्पर्धेत तिला फारशी चमक दाखवता आली नाही. असे असले तरी 2011 ते 2014 सालापर्यंत होत राहिलेल्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेत हॉकी महाराष्ट्र संघात स्थान मिळवत विऊद्ध संघाच्या खेळाडूंच्या तोडीस तोड असा खेळ करत राहिली. वारणानगरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रवेश घेतलेली रमा ही विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेतही चमकत राहिली. त्यामुळेच तिला तब्बल 3 वेळा शिवाजी विद्यापीठाच्या संघात स्थान मिळाले. 2015 साली मध्यप्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी तर शिवाजी विद्यापीठाच्या संघाच्या कर्णधारपदाची धुराही तिने सांभाळली. स्पर्धेतील 8 सामन्यात कर्णधारपदाला राजेसा खेळ करत गोल नोंदवण्याचाही तिने पराक्रम केला. रमाच्या या कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाचा संघ तब्बल 13 वर्षानंतर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. 2012 हे साल मात्र रमासाठी फार वेदनादायी ठरले. भारतीय महिला संघापर्यंत मजल मारण्यासाठी रोज चार ते पाच तास सरावात झोकून देताना रमाच्या गुडघ्याला दुखापत झाली. वेगवेगळे उपचार घेऊनही काही उपयोग न झाल्याने तिला नाईलाजास्तव गुडघ्यावर शस्त्रक्रीया कऊन घ्यावी. त्यामुळे सहाजिकच रमाला स्पर्धेत खेळण्यावर मर्यादा आली. आता मी खेळू शकणार नाही याच विचारात न गुरफटून जाता तिने हॉकी पंच म्हणून कार्यरत राहण्याचा विचार मनात घेतला. काही महिन्याच्या विश्रांतीनंतर रमा पंच होण्याच्या दृष्टीने तयारीला लागली. येथूनच हॉकीतील तिचा दुसऱ्या अध्याय सुऊ झाला. जाणकारांकडून पंचांचे नियम जाणून घेतले. पंचगिरी कशी करायची याच्या सरावाला 2014 साली सुऊवात केली. रोज केलेल्या सरावाच्या जोरावर तिने पुण्यात झालेल्या नॅशनल सबज्युनिअर मुलींच्या हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात यशस्वीपणे पंचगिरी कऊन दाखवली. ही पंचगिरी करण्यापूर्वी तिने हॉकी इंडियाची फिटनेस टेस्ट आणि ऑनलाईन टेस्ट दिली होती. यात यशस्वी झाल्याने तिला पुण्यातील स्पर्धेत पंचगिरी करण्याची संधी मिळाली. पुण्यातील यशस्वी पंचगिरी पाहून 2019 ते 2020 या कालावधीत तिला हॉकी इंडियाने पुणे (महाराष्ट्र), बेंगळूर, भोपाळ, मध्यप्रदेश (मध्यप्रदेश), हरियाणा, दिल्ली, लखनौ (उत्तरप्रदेश), रांची (छत्तीसगड), केरळ येथे झालेल्या 15 राष्ट्रीय स्पर्धेत पंचगिरी करण्यासाठी निवडले. या सर्व स्पर्धांमधील बाद फेरीतील सामन्यांसह अंतिम सामन्यांतही तिने अचुकपणे पंचगिरी कऊन राष्ट्रीय पंच म्हणून नाव कमवले. या स्पर्धांमधील पंचगिरीचा अनुभव तिला खेलो इंडिया युथगेम्सअंतर्गत झालेल्या 4 व खेलो इंडिया विद्यापीठ गेम्सअंतर्गत झालेल्या 2 स्पर्धांमध्ये पंचगिरी करताना कामी आला. या स्पर्धामध्ये तिने केलेल्या चांगल्या व कडक पंचगिरीवर एशियन हॉकी फेडरेशनची नजर गेली. तिच्याकडील पंचगिरीचे कौशल्य पाहून 2016 साली फेडरेशनने तिला थेट साऊथ एशियन गेम्समधील स्पर्धेत पंचगिरी करण्यास पाचारण केले. इतकेच नव्हे तर तिच्यातील पंचाला जागतिक मैदान मिळावे यासाठी फेडरेशनने मलेशियातील अॅडव्हान्स पंच कोर्ससाठी तिला पाठवले. चार दिवसांचा कोर्स पूर्ण कऊन भारतात परतलेल्या रमाला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीने पाच देशांच्या ज्युनिअर गर्ल्स हॉकी स्पर्धेत पंचगिरी करण्यास पाचारण केले. जागतिक पातळीवर नावाजलेल्या भारत, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम, स्पेन या संघामध्ये झालेल्या सामन्यात तीने निडरपणे पंचगिरी कऊन आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही पंचगिरी कऊ शकतो हे जगाला दाखवून दिले. तिची ही कामगिरी पाहून तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर होत राहिलेल्या स्पर्धांमध्ये पंचगिरी करण्यासाठी निवडले जाऊ लागले. तीनेही मोठे धाडस दाखवत भारत, सिंगापूर, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील बाद पद्धतीच्या व अंतिम सामन्यांमध्ये यशस्वीपणे पंचगिरी केली. पंचगिरीतील अनुभवाची शिदोरी उराशी बाळगून रमा ही गेल्या काही महिन्यांपासून ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत पंचगिरी करण्याच्या दृष्टीने तयारीला लागली आहे. जगभरात होत असलेल्या हॉकी स्पर्धांमधील सामने व त्यात पंचांनी दिलेले निर्णय घरातील टीव्हीवर पाहत आहे. विविध संकेतस्थळाच्या माध्यमातूनही पंचगिरीचा अगदी खोलात जाऊन ती रोज न चुकता अभ्यास करत आहे.
रमा ही आपल्या हॉकीतील यशाचे श्रेय आपल्या गुऊवर्याने देते. ती म्हणते की, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम जर कोल्हापुरात नसते तर मी हॉकीत गऊडझेप घेऊ शकली नसते. या स्टेडियमने माझ्या जीवनाला नवा आयाम मिळाला. याचबरोबर कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या संस्थापक शोभा तावडे, किशोर तावडे यांच्यासह कोल्हापुरातील ज्येष्ठ राष्ट्रीय हॉकीपट विजय साळोखे-सरदार, सुरेखा पाटील, मोहन भांडवले, मनोज भोरे, सागर जाधव, संतोष चौगुले, योगेश देशपांडे हे सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. यांच्याकडून सरावावेळी मिळत राहिलेल्या टिप्सचा मी स्पर्धेतील सामने खेळताना वापर करत गेले. त्यामुळेच मला शाळांपासून ते अगदी शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र महिला संघात स्थान मिळत राहिले. शिवाय काही अपवाद वगळता सर्वच स्पर्धांमधील सामने खेळण्याचे भाग्य मला लाभले.
– संग्राम काटकर
खेळ जुनाच ओळख नवी : कॅनोइंग
‘कॅनोइंग’ हा विख्यात क्रीडाप्रकार असून ऑलिम्पिकमध्येही त्याचे दर्शन घडते. खेळ म्हणून स्कॉटिश व्यक्ती जॉन मॅकग्रेगर यांनी तो सादर केला. त्यांनी 1866 मध्ये ‘रॉयल कॅनोइंग क्लब’ची स्थापना केली. 1874 मध्ये या क्लबने पहिली ‘पॅनोइंग’ स्पर्धा आयोजित केली, ज्याला ‘पॅडलिंग चॅलेंज्ड क्लब’ असे म्हटले गेले…
- ‘कॅनोइंग’ हा नौकानयनातला ‘पॅडल स्पोर्ट्स’चा एक प्रकार. यात खुल्या किंवा बंद ‘डेक’च्या नौकेत (कॅनोइ) नौकास्वार गुडघे टेकून किंवा समोरच्या दिशेने तोंड करून बसतो आणि एकेरी पात्याचे वल्हे वापरून नौकेला पुढे नेतो. ‘कॅनोइंग’ आणि ‘कयाकिंग’ यात सामान्य फरक असा की, ‘कयाकिंग’मध्ये ‘रायडर्स’ नेहमी बसलेले असतात आणि दुहेरी पात्यांचे वल्हे वापरतात…
- ‘कॅनोइंग’च्या विविध प्रकारांमध्ये ‘कॅनोइ रेसिंग’, ‘कॅनोइ पोलो’, ‘कॅनोइ फ्रीस्टाइल (प्लेबोटिंग), ‘एक्स्ट्रिम रेसिंग’, ‘कॅनोइ मॅरेथॉन’, ‘कॅनोइ स्लॅलम’ आणि ‘सर्फ स्कीइंग’ यांचा समावेश होतो…‘कॅनोइंग’च्या सुऊवातीच्या काळात नौकेत बसण्याची व्यवस्था नसायची अन् नौकानयनपटू नौकेच्या तळाशी गुडघे टेकवायचे…
- आधुनिक ‘कॅनोइंग’ नौका वेगवेगळ्या आकाराच्या असल्या, तरी साधारणपणे 4.5 ते 6 मीटर लांब आणि सुमारे 33 इंच ऊंद असतात. त्यांची खोली सुमारे 12 ते 14 इंच असते. या नौका लाकूड, लाकडाच्या फ्रेमवर कॅनव्हास, अॅल्युमिनियम, मोल्डेड प्लास्टिकच्या आणि हल्लीच्या काळात फायबरग्लास वा ‘सिंथेटिक फायबर’पासून बनविलेल्या असतात….
- हा प्रकार 1924 मध्ये ऑलिम्पिक खेळांत पहिल्यांदा दिसून आला. त्यावेळी ‘कॅनेडियन कॅनोइ’चे प्रदर्शनीय सामने झाले होते. बारा वर्षांनंतर ‘कॅनोइ स्प्रिंट प्रकार’ बर्लिनमध्ये 1936 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये झळकला, तर ‘स्लॅलम’ प्रकाराचे प्रथम 1972 मध्ये दर्शन घडले आणि त्यानंतर 1992 पासून त्याच्या शर्यती होऊ लागल्या…टोकियोमध्ये झालेल्या 2020 च्या ऑलिम्पिकपासून महिलांसाठीही ‘स्प्रिंट कॅनोइंग’मध्ये पदक मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे…
- ‘स्प्रिंट’मध्ये बहुतांश शर्यती या व्यक्तिगत स्तरावर होतात आणि स्पर्धक 200 नि 1000 मीटर्सच्या अंतराच्या संथ वाहणाऱ्या पाण्यातील मार्गावर एकमेकांशी शर्यत करताना दिसतात. त्यात आठपर्यंत वैयक्तिक नौकानयनपटू सहभागी होतात आणि प्रत्येकाने त्यांना दिलेल्या लेनमध्ये राहणे आवश्यक असते. त्यांनी शक्य तितक्या लवकर अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे असतात…2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘स्प्रिंट कॅनोइंग’ प्रकारात पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी पाच याप्रमाणे 10 शर्यती होतील…
- ‘स्लॅलम’मध्ये स्पर्धकांना खळाळत्या पाण्याच्या प्रवाहातून 300 मीटर्सपर्यंतचे अंतर टांगण्यात आलेल्या जास्तीत जास्त 25 ‘गेट्स’मधून शक्य तितक्या लवकर कापावे लागते. ‘गेट’ला स्पर्श केल्यास दोन सेकंदांचा, तर ‘गेट’ चुकविल्यास 50 सेकंदांचा भुर्दड सहन करावा लागतो…
- ‘ऑलिम्पिक’मधील सर्वोत्कृष्ट कॅनोइंगपटू म्हणून जर्मनीच्या बर्गिट फिशरचे नाव घ्यावे लागेल. त्याने 1980 पासून 2004 पर्यंत चाललेल्या आपल्या कारकिर्दीत 8 सुवर्णपदके आणि 4 रौप्यपदके जिंकली…
– राजू प्रभू









