शाळेनी क्रिडा स्पर्धेबद्दल तयारी करण्याचा सल्ला, विविध बाबींचे आयोजन, स्किपींगला प्राधान्य
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व एसकेई कन्नड माध्यम स्कुल आयोजित छत्रपती शिवाजी क्लस्टर प्राथमिक विभागीय क्रीडा स्पर्धा ऑगस्ट महिन्यात घेण्याचा निर्णय घण्यात आला. एसकेई कन्नडा स्कुलच्या सभागृहात घेण्यात आलेलया बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून आपल्या बेळगाव शहराच्या पीईओ जे. बी. पटेल, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टिळकवाडी झोनचे अध्यक्ष विवेक पाटील, एस. एन. अमासी, अनिल पाटील तसेच एसकेई कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका एस. डी. नायक, हायस्कूल विभागाचे मुख्याध्यापक सदाशिव वैजनाथ मठ, एस. के.ई. मराठी विभागाच्या मुख्याध्यापिका गायत्री शिंदे तसेच पी. एस. खानगावकर उपस्थित होते.
यावेळी जे. बी. पटेल यांनी चालु वर्षाच्या प्राथमिक क्रीडा विषयी माहिती दिली. या वर्षा प्राथमिक क्रीडा स्पर्धा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार असुन त्यासाठी sशाळेनी तयारीला लागावे. गतवर्षी ज्या ज्या खेळांच्या विविध बाबी होत्या त्याच बाबींमध्ये यावर्षी क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी येत्या महिन्यात विद्यार्थ्यांच्याकडून सराव करुन घ्यावा. यावर्षी बेळगावातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकावेत यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी एसकेई कन्नडाच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने सुरूवात झाले. पाहुण्यांचे स्वागत एस. डी. नाईक व पी. जी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील, जयसिंग धनाजी, उमेश मजुकर, उमेश बेळगुंदकर, बापू देसाई, सेलविया डिलिमा, सुनीता जाधव, जे. बी. पाटील, सोमशेखर हुद्दार, संतोष दळवी, अशोक बुडवी, अनिल मुगळीकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. डी. जिरे यांनी केले. आर. बी. पाटील यांनी आभार मानले.









