जी. जी. चिटणीस स्कूल आयोजित प्राथमिक क्रीडा स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व जी. जी. चिटणीस स्कूल आयोजित श्री छत्रपती शिवाजी टिळकवाडी, अनगोळ, शहापूर क्लस्टर क्रीडा स्पर्धांना शुक्रवार दि. 14 जुलैपासून प्रारंभ होत आहेत. जवळपास 25 प्राथमिक शाळांनी या स्पर्धेत सहभाग दाखविला आहे. जी. जी. चिटणीस स्कूलच्या सभागृहात आयोजित श्री छत्रपती शिवाजी टिळकवाडी, अनगोळ, शहापूर क्लस्टर क्रीडा स्पर्धेसाठी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत बेळगाव शहर, पीईओ जे. बी. पटेल, शिक्षण संयोजिका एस. एल. सुर्यवंशी, सीआरसी वंदना बर्गे, प्राथमिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष संजीव बडिगेर, मुख्याध्यापिका डॉ. नविना शेटीगार, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वेवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. इशा वेर्णेकरच्या स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका नविना शेटीगार यांनी केले. यावेळी जे. बी. पटेल क्रीडासंबंधी माहिती देऊन विभागस्तरीय स्पर्धा 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावेत. 10 नंतर तालुकास्तरीय स्पर्धा सुरू होणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्राथमिक क्रीडा स्पर्धांना 14 पासून प्रारंभ होणार असून 14 जुलै रोजी योगासन व बुध्दीबळ केएलई स्कूल येथे, 15 जुलै रोजी टेबल टेनिस बालिका आदर्श विद्यालय येथे, 18 जुलै रोजी व्हालिबॉल जी. जी. चिटणीस येथे, 21 जुलै रोजी कब•ाr व्हॅक्सीन डेपो येथे, 22 जुलै रोजी बास्केटबॉल डी. पी. स्कूल येथे, 24 ऑगस्ट रोजी शटल बॅडमिंटन ओरिएंटल येथे, 26 जुलै रोजी हॅन्डबॉल व्हॅक्सीन डेपो येथे, 28 जुलै रोजी मुलींचे फुटबॉल लेले मैदानावर, 1 ऑगस्ट रोजी खो-खो आदर्श विद्या मंदिर शहापूर तर थ्रोबॉल जी. जी. चिटणीस येथे, अॅथलेटिक्स स्पर्धा 8 ऑगस्ट रोजी आरपीडी मैदानावर घेण्यात येणार आहे. यावेळी ए. सी. कांबळे, सी. एम. खम्मार, बी. बी. देसाई, सिल्विया डिलीमा, उमेश बेळगुंदकर, मॅथ्यू लोबो, अनिल मुगळीकर, पी. एस. कोरे, एस. पी. बुडवी, शितल सानेगाव, एस. व्ही. सिंगाडी, उमेश मजुकर, संतोष दळवी, प्रविण पाटील, आर. बी. परीट, सी. आर. पाटील, सुनिता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनश्री होनगल तर आभार जयसिंग धनाजी यांनी मानले.