वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
द.म.शि. मंडळ संचलित महात्मा गांधी हायस्कूल गौंडवाड हायस्कूलच्या वार्षिक क्रीडास्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. अध्यक्षस्थानी शिक्षणप्रेमी एन. वाय. पिंगट होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. शाळेचे मुख्याध्यापक पी. ओ. पाटील यांनी प्रास्ताविक करून क्रीडा स्पर्धेचा उद्देश सांगितला. यावेळी क्रीडा स्पर्धेचे ध्वजपूजन व ध्वजारोहण करून स्पर्धांचे उद्घाटन एन. वाय. पिंगट यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा साहित्याचे पूजन शाळेचे सहशिक्षक जे. पी. अगसीमनी यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे स्वागत मुख्याध्यापक पी. ओ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली. यावेळी पी. एच. पाटील, एस. एस. लाड, एस. वाय. आंबोळकर, पी. आर. पाटील, यु. बी. बामणे उपस्थित होते.









