पुणे / प्रतिनिधी :
आठवडाभर राज्यात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. पण त्याचा प्रभाव विदर्भात अधिक जाणवला. इतरत्र दोन दिवस पाऊस होता. त्यानंतर मात्र राज्यात पुन्हा पावसाने ओढ दिली आहे.
सध्या मध्य प्रदेश व लगतच्या भागात हवेची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीमच्या भागात पुढील दोन ते तीन दिवस दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर महाराष्ट्रात सर्वदूर तुरळक पावसाची शक्यता आहे.








