प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी आनंदनगर, नाझरकॅम्प परिसरात शुक्रवारी रात्री प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव क्रॉस येथील रेणुका हॉटेलपासून या पदयात्रेला प्रारंभ झाला. पाटील परिवारच्यावतीने रमाकांत कोंडुस्कर यांचे स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले.
त्यानंतर हरिजनवाडा येथील मतदारांची भेट घेतली. नाझरकॅम्प येथे देखील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, उमेश पाटील, शिवानी पाटील, शाम कुडुचकर, किरण सावंत, सतीश धामणेकर, शशिकांत धामणेकर या सर्वांनी त्यांचे स्वागत केले.
कारभार गल्ली येथील मागील बाजूला ज्ञानेश्वर मण्णूरकर यांनी स्वागत केले. आनंदनगर पहिला क्रॉस येथे सायनेकर बंधू, अमित बर्गे, सुनील हलगेकर, शुभम हलगेकर, निलजकर बंधू, मुचंडी परिवार या सर्वांनी कोंडुस्कर यांचे स्वागत केले. आनंदनगर तिसरा क्रॉस येथे अमित गिंडे, विनायक निंबाळकर, नितीन निंबाळकर, राहुल सुतार, कांदेकर, धोंगडी परिवार, ओंकारनगर येथे केशव पाटील, युवराज पाटील, नेया मेणसे यांनी स्वागत केले.
आनंदनगर रहिवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. निवृत्त प्राचार्य बळीराम काळसे यांना भेटून आशीर्वाद घेतला. या पदयात्रेमध्ये माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक रवी धोत्रे, माजी नगरसेवक अनिल पाटील, मनोहर हलगेकर, महेश जुवेकर, प्रदीप मुरकुटे, दिनेश राऊळ, दीपा कुंभार, मंदाकिनी धावणे, लक्ष्मी पाटील, रेणुका गिंडे, सुनीता धोंगडी, इंद्रायणी गावडोजी, उदय महागावकर, सुमन कांदेकर, अजय निंबाळकर, उमेश गिंडे, परसू पाटील, मंथन मुचंडी, मधू मुचंडी, दीपक पाटील, मारुती रेडेकर, हर्षवर्धन बर्गे, प्रमोद उपाध्ये, साई लाळगे, विकास काळसेकर, गंधार पाटील, ओम सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









