अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे केले होते आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोकमान्य रंग मंदिर येथे शनिवारी झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. व्यंग चित्रकार जगदीश पुंटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन समिती नेते रमेश पावले यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर नेताजी जाधव, वाय. पी. नाईक, प्रा. मयूर नागेनहट्टी, प्रा. परसू गावडे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सूरज कुडुचकर, किरण हुद्दार उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वाय. पी. नाईक, प्रा. मयूर नागेनहट्टी, प्रा. परसू गावडे, प्रा. अरविंद पाटील, वृषाली कदम-द•ाrकर, सोनाली कांगले यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्राथमिक गट- 1) क्रांती मारुती पाटील, 2) पूर्वी रमेश घाडी, 3) अथर्व विठ्ठल गुरव, उत्तेजनार्थ आदिती दिनकर परमोजी, माध्यमिक गट- 1) साईराज राम गुरव, 2) वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, 3) हर्ष गावडू पाटील, उत्तेजनार्थ हर्षदा म्हात्रू भातकांडे, महाविद्यालयीन गट- 1) संकेत पाटील, 2) सायली तुपारे, 3) आर्या गायकवाड, उत्तेजनार्थ अनुजा लोहार यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले.
बक्षीस वितरण समारंभाला रणजीत चव्हाण-पाटील, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, संतोष कृष्णाचे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शिवानी पाटील, डॉ. पोटे, सविता देगीनाळ, सागर पाटील, शिवराज पाटील, प्रशांत भातकांडे, बाळू जोशी, शेखर तळवार, उमेश पाटील, प्रतिक पाटील, विनायक कावळे, आशिष कोचेरी, अजय सुतार, श्रीकांत कदम यासह इतर उपस्थित होते.









