140 जणांनी केले रक्तदान : शनैश्चर जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन
बेळगाव : शनैश्चर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे शनैश्चर जयंतीनिमित्त मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 140 हून अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. केएलई ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिर झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष पत्तार उपस्थित होते. डॉ. संतोष पत्तार व केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष अनिल चौधरी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या 27 वर्षांच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती देण्यात आली. डॉ. श्रीकांत विरगी यांनी सोसायटीचे कौतुक केले. डॉ. विठ्ठल माने यांनी शुभेच्छा दिल्या. संचालक संजय शहा यांनी आभार मानले. गजानन पाटील यांनी लोकसहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवराज पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी महादेव चौगुले, महांतेश देसाई, शिवाप्पा इटगी, संजय भावी, अमर चौगुले, शिवाजी चौगुले, पवन पाटील, विजय चौगुले, श्रीकांत देसाई, संतोष अक्कोळे, प्रभाकर पाटील, प्रभाकर हलगेकर यासह इतर उपस्थित होते.









