शुक्रवारच्या आठवडी बाजारातही शुकशुकाट
आजरा
आजरा शहरात झालेल्या आंतरधर्मीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदु समाजाच्या वतीने शुक्रवारी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बंदमुळे शुक्रवारच्या आठवडा बाजारातही शुकशुकाट होता. बंदच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी रामदार इंगवले, आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.
शहरात झालेल्या आंतरधर्मिय विवाहानंतर गेले आठ-दहा दिवस शहरात याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होते. तर शुक्रवारी सकल हिंदु समाजाकडून आजरा बंदची हाक देण्यात आली. या बंदला सर्वधर्मिय व्यापारी, व्यावसायिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर व्यापारी न आल्याने शुक्रवारचा आठवडा बाजारही भरला नाही. यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट दिसत होता. तर बंदकाळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








