प्रतिनिधी/ बेळगाव
सन्मान हॉटेलच्या सभागृहात गेल्या सोमवारपासून सुरू असलेल्या रूद्राक्ष पद्रर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रदर्शन आता फक्त दोन दिवस असणार आहे. श्रावण महिन्यात अनेक संकल्प केले जातात. श्रावणमध्ये रूद्राक्ष घालणे शुभ मानले जाते. त्यामुळे ग्राहकांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
या प्रदर्शनात जन्म तारखेनुसार रूद्राक्ष उपलब्ध असून, एकमुखी ते एकवीसमुखी अस्सल रूद्राक्ष उपलब्ध आहेत. सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असल्याचे कळविण्यात आले आहे.









