अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाचे औचित्य
आंबोली । प्रतिनिधी
मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी गावागावातील तरुण मंडळाने साहित्य विषयक विविध उपक्रम आयोजित करुन विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याची अभिरुची निर्माण करून गावातील ग्रंथालय समृद्ध करावीत व लोक साहित्याला चालना द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे यांनी केले. “आरती मासिक, चौकुळ ग्रामपंचायत व चौकुळ गावातील वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा सन्मान चौकुळ गावात मराठी भाषा गौरव फेरी काढून साजरा करण्यात आला. यावेळी भरत गावडे यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्याचा गौरव करून विश्व साहित्य संमेलन, केसरकर यांच्यामुळेच झाले असल्याचे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा’ याबाबत सविस्तर माहिती व साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या व्यासपिठावर चौकूळ गावचे सरपंच गुलाबराव गावडे, भरत गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक गावडे, प्रमुख प्रमुख पाहुणे. द. म. गवस (गुरुजी), शंकर प्रभू, वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण गावडे, सुरेश गावडे, आनंद चव्हाण, विठ्ठल गावडे, भिकाजी गावडे, केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावडे, महादेव गावडे आदी उपस्थित होते.मराठी भाषा गौरव फेरीची सुरुवात श्रीदेवी सातेरी मंदिरापासून सुरु करण्यात आली. मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेऊन करण्यात आली. या फेरीत चौकुळ केंद्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, वारकरी संप्रदाय, मंडळ, बचतगट, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामपंचायत कार्यालयात दीप प्रज्ज्वल करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी द म गवस, शंकर प्रभू यांनी मराठी कविता सादर केल्या. लक्ष्मी गावडे यांनी जात्यावरच्या व शुभकार्याच्या ओव्या सादर केल्या. मराठी शाळेतील मुलांनी संत महिमा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गुलाब गावडे, आनंद चव्हाण यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. गावातील चांगले वाचक, लोक साहित्याचे संवर्धन करणान्या पाच व्यक्तींचा शाल पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांचे आभार गणपत पाटील यांनी मानले.









