वार्ताहर/उचगाव
उचगाव येथे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टीस्टेट) आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 19 सप्टेंबर रोजी मोफत बीपी आणि शुगर तपासणी शिबिराचे आयोजन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी उचगाव शाखा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये उचगाव आणि परिसरातील जवळपास दीडशे रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले. उचगाव येथील गुरुकृपा कॉम्प्लेक्स कोवाड रोड उचगाव येथील, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. च्या उचगाव शाखेमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी या शिबिरामध्ये येऊन आपल्या बीपी आणि शुगरची मोफत तपासणी करून घेतली. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ग्रा.पं. माजी अध्यक्ष संभाजी कदम, माजी सदस्य बी. एस. होनगेकर, अॅड. अनिल पावशे, माजी सदस्य रामा कदम, ब्रह्मानंद पाटील, वामन कदम, शिवाजी चौगुले उपस्थित होते. शिबिरामध्ये वेणूग्राम हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहल केदार, रोहन रेडेकर, पिआरओ जगदीश बेळगावकर यांनी रुग्णांची तपासणी केली. लोकमान्य सोसायटी उचगाव शाखेचे मॅनेजर भूषण वालावलकर तसेच कर्मचारी सागर कांबळे, तृप्ती पाऊसकर, पराशी फर्नांडिस यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









